१७ .प्रकाशाचे परिणाम




रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


अ. रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास......व........ छाया पाहता येतात. 


उत्तर - प्रच्छाया


आ. चंद्रग्रहणाच्या वेळी....... ची सावली वर पडते.


उत्तर - उपच्छाया


इ. सूर्यग्रहणाच्या वेळी सावली........वर पडते.


उत्तर - पृथ्वी, चंद्रा


ई. सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी ............मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.


उत्तर - चंद्रा, पृथ्वी




2. कारणे लिहा.


  अ. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.

उत्तर -

१) पृथ्वीवरील वातावरणापलीकडे निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश पसरण्यासाठी कोणतेही माध्यम नसते म्हणून पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.



आ. सावलीत बसून वाचता येते.

उत्तर -

१) सूर्य हा प्रकाशस्त्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे 

२) त्यापासून पृथ्वीवर कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रच्छाया नसून फिकट उपच्छाया असते 

३) यामुळे वाचन करण्याइतका प्रकाश उपलब्ध असतो



 इ. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये.

उत्तर -

सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचतात. सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये. जे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक असतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे काळे चश्मे वापरावे.


3. प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा.

उत्तर -

(1) निळे आकाश. 

(2) धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत. 

(3) सूर्यास्तावेळी दिसणारा तांबडा सूर्य. 

(4) सिनेमा प्रोजेक्टरमधून पडद्यावर पडणारा प्रकाशझोत


4. हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची/विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही ?

उत्तर -

१) सूर्य हा प्रकाश स्त्रोत पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे.

२) पक्षी व विमान यांच्या प्रच्छाया व उपच्छाया जमिनीवर पडतात.

३) जेव्हा पक्षी/ विमान आकाशात उंच जात असतात तशी त्यांची प्रच्छाया लहान लहान होत नाहीशी होते

४) याच वेळी उपच्छाया अधिकाधिक फिकट होत होत नाहीशी होते.


5. बिंदुस्रोतामुळे उपच्छाया का मिळत नाही ?

उत्तर -

१) बिंदुम्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळे त्याच्यासमोर असलेल्या वस्तूची केवळ गडद छाया मिळते.



खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 


अ. प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय ?

उत्तर -

वातावरणातील रेणू, धूलिकण व इतर सूक्ष्म कण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात, या घटनेला 'प्रकाशाचे विकिरण' म्हणतात.



आ. शून्यछाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का ?

उत्तर -

१) ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्यछाया दिन म्हणतात. या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते.

२) पण आपली सावली थेट पळवलांच्या खाली पडते ती आपल्या दृष्टीस पडत नाही म्हणून आपल्याला छाया लुप्त झाली असे वाटते.


इ. बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाशकिरण टाकल्यास तो दिसेल का ?

उत्तर -

लेझर प्रकाशकिरण दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवर आदळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत. बंद काचेच्या पेटीत धुपाचे सूक्ष्म कण विखुरलेले असतात. त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यांत शिरतात ज्यामुळे तो आपणांस दिसतो.




7. चर्चा करा व लिहा.


अ. 'सूर्य उगवलाच नाही तर', यावर तुमच्या शब्दांत विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा. करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल.

उत्तर -

१) सूर्य उगवला नाही तर पृथ्वीच्या एका भागात अंधार पसरेल व एका भागात सतत सूर्यसमोर असल्यामुळे तेथे प्रचंड ऊष्णता वाढेल.

२) प्रकाश संश्लेषण न झाल्यामुळे वनस्पती नष्ट होतील

३) वनस्पतीवर अवलंबून असलेली सर्व प्राणीसृष्टी नष्ट होईल

४) सूर्याच्या उष्णतेने होणारे बाष्पीभवन होणार नाही यामुळे पाऊस पडणार नाही 

५) यामुळे पाण्याची टंचाई होईल

६) परिणामी समस्त वनस्पती व प्राणीजीवन संपुष्टात येईल.



आ. ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर कोणते प्रयत्न कराल ? 

उत्तर -

१) ही एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटव शकतो

२) लोकांना टेलेस्कॉपद्वारे सूर्यग्रहण दाखवू शकतो

३)सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवू शकतो.



इ. विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती.

उत्तर -

सूर्यग्रहण -

फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण हे अमावास्येलाच दिसते. सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असते.


खग्रास' सूर्यग्रहण -

 काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा ‘खग्रास' सूर्यग्रहण होते.


खंडग्रास' सूर्यग्रहण -

 जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा 'खंडग्रास' सूर्यग्रहण होते.


चंद्रग्रहण

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसते.


खग्रास' चंद्रग्रहण

पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर 'खग्रास' चंद्रग्रहण घडते. 

'खंडग्रास' चंद्रग्रहण

चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर 'खंडग्रास' चंद्रग्रहण घडते.




फरक स्पष्ट करा.


अ. प्रकाशाचे बिंदुस्रोत व विस्तारित स्रोत

उत्तर -


प्रकाशाचे बिंदुस्रोत


1. प्रकाशाचा बिंदुस्रोत आकाराने सूक्ष्म असतो. 

2. या स्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया प्रच्छाया)

 मिळते.

3. उदा . छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश



विस्तारित स्रोत


1. प्रकाशाचा विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो. 


2. या स्रोतापासून वस्तूच्या दोन छाया (प्रच्छाया व

उपच्छाया) मिळतात.


3. उदा. सूर्य



आ. प्रच्छाया व उपच्छाया

उत्तर -


प्रच्छाया


1. प्रच्छाया गडद असते.

2. प्रच्छाया बिंदुस्रोत, तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते.

3. प्रच्छायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते.


उपच्छाया


1. उपच्छाया फिकट असते.

2. उपच्छाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते.

3. उपच्छायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते.

Post a Comment

0 Comments