२.अबब ! किती प्रकारचे हे प्राणी


अ) काय करावे बरे?
पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, चिकन गुनिया या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत.
उत्तर - साचलेल्या पाण्यात डास वाढतात म्हणून पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी असेल तर त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. 

आ) जरा डोके चालवा. 
१) भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी ?
उत्तर - कीटक 

२) मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे ?
उत्तर - मासा आणि सरडा हे दोन्ही सजीव व प्राणी आहेत. तसेच त्यांच्या अंगावर खवले असतात. 

३) अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता ?
उत्तर - वाघ, झेब्रा 

४) वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात ?
उत्तर - उंट वाळवंटातील वाळूमध्ये सुलभतेने चालू शकतो. पाण्यावाचून बरेच दिवस जगू शकतो. वाळवंटातील लोक उंटिणीचे दूध पितात. वाळवंटातून ओझे वाहून नेण्यासाठी उंटांचा वापर करतात. 

५) मेंढ्या कशासाठी पाळतात ?
उत्तर - लोकर मिळवण्यासाठी मेंढ्या वापरतात. 

६) कोंबड्या कशासाठी पाळतात ?
उत्तर - मांस व अंडी मिळण्यासाठी कोंबडया पाळतात. 

७) वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर - घोडा, चित्ता 

८) उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्षांची नावे लिहा .
उत्तर - गरुड, घार, गिधाड 

९) अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते ?
उत्तर - हरीण 

१०) आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते ?
उत्तर - सिंह 

इ) पुढील वाक्य पूर्ण करा.
सर्व कावळे काळे असतात, सर्व पोपट हिरवे असतात, पण गाईंचा रंग वेगवेगळा असतो.
गाई काळ्या, पांढऱ्या किंवा लाल असतात.

ई) माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा.
शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्याची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा.

उ) पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते ?
उत्तर - गाय, म्हैस, बकरी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते. 

२) घरात उंदीर का नको असतात ?
उत्तर - उंदीर घरातील वस्तू कुरतडतात व साठवणीतले धान्य फस्त करतात म्हणून घरात उंदीर नको असतात. 

३) माशांचा संचार कुठे असतो ?
उत्तर - माशांचा संचार पाण्यात असतो. 

४) अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते ?
उत्तर - गरुड, चिमणी, कावळा, बगळा, कोंबडा 

५) पक्ष्यांना किती पाय असतात ?
उत्तर - पक्षांना दोनच पाय असतात. 

ऊ) चूक की बरोबर ते सांगा.
१) बगळा पांढरा असतो.
उत्तर - बरोबर 

२) पोपटाच्या अंगावर खवले असतात.
उत्तर - चूक 

३) मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते.
उत्तर - चूक 

४) पालीच्या अंगावर केस असतात.
उत्तर - चूक 

५) कोंबडा खूप उंच उडत नाही.
उत्तर - बरोबर 



ए) जोड्या जुळवा. 
अ गट ब गट 
१) सरडे १) सहा पाय असतात.
२) घार २) सरपटतात.
३) वटवाघुळ ३) पाण्यात राहतात.
४) फुलपाखरू ४) उडू शकते पण पक्षी नाही.
५) मासे ५) आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते.


उत्तर - 
अ गट ब गट 
१) सरडे २) सरपटतात.
२) घार ५) आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते.
३) वटवाघुळ ४) उडू शकते पण पक्षी नाही.
४) फुलपाखरू १) सहा पाय असतात.

५) मासे ३) पाण्यात राहतात.



ऐ) पुढील प्राणी ओळखा. 
१) घरात जळमटे करणारा.
उत्तर - कोळी

२) रंगीबेरंगी.
उत्तर - मोर 

३) सोंड असलेला.
उत्तर - हत्ती 

४) वेगाने धावणारा.
उत्तर - हरीण 

ओ) पुढील प्राण्यांना किती पाय असतात ?
१) साप
उत्तर - सापाला पाय नसतात. 

२) गरुड
उत्तर - गरुडाला दोन पाय असतात. 

३) हरीण
उत्तर - हरीणाला चार पाय असतात. 

४) पाल
उत्तर - पालीला चार पाय असतात. 

५) माशी
उत्तर - माशीला सहा पाय असतात. 

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال