अ. औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी......व......... संमिश्रांचा उपयोग केला जातो.
उत्तर - निपरमॅग
आ. चुंबकीय क्षेत्र यांमधून आरपार जाऊ शकते.
उत्तर - अल्निको
इ. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता रेषांच्या......साहाय्याने दर्शवतात.
उत्तर - पुठ्ठा, पाणी
ई. चुंबकाची खरी कसोटी......ही आहे.
उत्तर - बल
2. सांगा मी कोणाशी जोडी लावू?
'अ' गट
अ. होकायंत्र - सूचीचुंबक
आ. कपाटाचे दार - चुंबक
इ. प्रतिकर्षण - सजातीय ध्रुव
ई. चुंबकीय ध्रुव - सर्वाधिक चुंबकीय बल
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा.
उत्तर -
एकस्पर्शी पद्धती
एक पोलादी पटट्री टेबलावर ठेवा. एक पट्टीचुंबक घेऊन त्याचा 'N' ध्रुव पोलादी पट्टीच्या ‘अ’ टोकावर टेकवा आणि तो 'ब' टोकाकडे घासत न्या. पट्टीचुंबक उचलून पुन्हा त्याचा ‘N’ ध्रुव पोलादी पट्टीच्या 'अ' टोकाकडून 'ब' टोकाकडे घासत न्या. ही कृती 15 ते 20 वेळा करा. आता पोलादी पट्टी लोखंडी किसाजवळ न्या व निरीक्षण करा. पट्टी दोऱ्याला मुक्तपणे टांगून निरीक्षण करा. पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झालेले दिसेल. चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीला एकस्पर्शी पद्धती म्हणतात.
या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते.
द्विस्पर्शी पद्धती
एक पोलादी पटट्री टेबलावर ठेवा. दोन पट्टीचुंबक घ्या. चुंबकीय पट्ट्यांचे दोन विजातीय ध्रुव पोलादी पट्टीच्या मध्यावर टेकवा. एका चुंबकीय पट्टीचा 'S' ध्रुव 'अ' टोकाकडे घासत न्या. त्याच वेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा ‘N' ध्रुव 'ब' टोकाकडे घासत न्या. वरील कृती 15 ते 20 वेळा करा. आता पोलादी पट्टी लोखंडी किसाजवळ न्या. निरीक्षण करा. पट्टी मुक्तपणे टांगून निरीक्षण करा.
या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धती म्हणतात.
या पद्धतीने निर्माण होणारे चुंबकत्व हे एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकते.
आ. विदयुत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो ?
उत्तर -
लोखंडी खिळा, सुमारे 1 मीटर लांब तांब्याची तार, एक बॅटरी आणि टाचण्या या वस्तू वापरून विदयुत चुंबक तयार करता येतो आणि त्याची परीक्षा घेता येते.
इ. टीप लिहा - चुंबकीय क्षेत्र.
उत्तर -
ब्रिटिश संशोधक मायकेल फॅरेडे याने चुंबकपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना 'चुंबकीय बलरेषा' म्हटले. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते, त्यास 'चुंबकीय क्षेत्र' म्हणतात. चुंबकाभोवतीचे हे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते. एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात, त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता (Intensity of magnetic field) समजते.
ई. होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर का केला जातो ?
उत्तर -
चुंबकाच्या गुणधर्मानुसार होकायंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबकसूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते. त्यावरून दिशांचे ज्ञान होते. म्हणूनच होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर करतात.
उ. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर -
(1) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या साहाय्याने दाखवली जाते. एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात, त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते. ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते, त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात.
2) चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेनुसार समजते. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय क्षेत्राची दिशादेखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते.
4. पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशाप्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा.
उत्तर -
पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होकायंत्राचा वापर करीत असत. या होकायंत्रात चुंबकसूची वापरलेली असे. ही चुंबकसूची एका तीक्ष्ण टोकावर क्षितिजसमांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते. चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण-उत्तर त्याच दिशेला स्थिर राहते. त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ते समजले की इतर दिशा समजू शकतात. समुद्र व वाळवंटात रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते. अशा वेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग होत असे.
0 Comments