अ. खनिजसंपत्ती
उत्तर -
नैसर्गिक साधनसंपदेत खनिज संपदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात. विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार (लांबी), फटी, छटा यांवरून खनिजांचे गुणधर्म स्पष्ट होतात. हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन अशी काही महत्त्वाची खनिजे रत्नस्वरूपात वापरली जातात. त्यांना मोठी मागणी असते.
अधातु खनिजे - अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्रॅफाईट, हिरा, फेल्डस्पार.
धातू खनिजे - लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साईट, मँगनीज प्लॅटिनम, टंगस्टन,
उर्जारुपी खनिजे - दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू.
काही प्रमुख खनिजे - लोह, मँगनीज, बॉक्साइट, तांबे, अभ्रक
आ. वनसंपत्ती
उत्तर -
वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे 30% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलांची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्ये आहेत.
वांसंपत्तीपासून आपल्याला खूप फायदे आहेत जसे
साग, शिसम, कडुनिंब, बाभूळ, सुबाभूळ या झाडांपासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. याचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी, तसेच बांधकामात केला जातो.
जंगलसंपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यांपासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात. साबण, सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. यांशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ मिळतात.
अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, तुळस अशा औषधी वनस्पती उपलब्ध आहेत.
इ. सागरसंपत्ती
उत्तर -
महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. भरती-ओहोटीच्या लाटा आणि समुद्रप्रवाहांचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी केला जात आहे. याविषयी आपण मागील इयत्तेत भूगोल विषयातही माहिती घेतली आहे. सागरजलात, सागरतळावर व सागरतळाखाली विविध नैसर्गिक संपत्तींचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला 'सागरसंपत्ती' असे म्हणतात.
महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमिअम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मँगनीज, गंधक, युरेनिअम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती मिळतात. खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षासुद्धा अधिक असते.
सागरतळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो.
2 खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. जीवाश्म इंधन म्हणजे काय ? त्यांचे प्रकार कोणते ?
उत्तर
१) जीवाश्म (जीव = सजीवसृष्टी, अश्म = दगड) म्हणजे जीवाचे दगडात झालेले रूपांतर.
२) या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात होते.
३) त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार होतो
४) तसेच इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार होते.
आ. खनिज तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा.
उत्तर -
पेट्रोलिअम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगेही असतात. पेट्रोलिअमचे तेलविहिरींच्या माध्यमातून उत्खनन करून, प्रभाजी ऊर्ध्वपातनाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलिअमपासून विमानाचे पेट्रोल, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅप्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात.
इ. जंगलातून आपणांस काय काय मिळते?
उत्तर -
साग, शिसम, कडुनिंब, बाभूळ, सुबाभूळ या झाडांपासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. याचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी. तसेच बांधकामात केला जातो.
जंगलसंपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यांपासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात. साबण, सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. यांशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ मिळतात.
अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, तुळस अशा औषधी वनस्पती अत्यंत उपयोगी आहेत.
ई. सागरसंपत्तीमध्ये कशाकशाचा समावेश होतो? त्याचा आपल्याला काय उपयोग आहे?
उत्तर -
सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमिअम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे,मँगनीज, गंधक, युरेनिअम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत.
सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती मिळतात. खऱ्या
मोत्यांची किंमत सोन्यापेक्षासुद्धा अधिक असते.
सागरतळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो.
थोरिअम - अणु ऊर्जानिर्मितीमध्ये वापर.
मॅग्नेशिअम - कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये.
पोटॅशिअम - साबण, काच, खतनिर्मिती मधील प्रमुख घटक.
सोडिअम - कापड, कागदनिर्मितीमध्ये वापर. सल्फेट - कृत्रिम रेशीम तयार करणे.
कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे - प्रथिने व जीवनसत्त्वे यांचे स्रोत असल्याने अन्न म्हणून प्रमुख उपयोग.
सुकट, बोंबील यांची भुकटी - कोंबड्यांचे खादय, उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापर.
शिंपले- औषधनिर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी.
बुरशी - प्रतिजैविकांची निर्मिती.
शार्क, कॉड मासे - अ, ड, इ जीवनसत्त्वयुक्त तेलनिर्मिती. समुद्रकाकडी - कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून वापर.
वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा ?
उत्तर -
१) जीवाश्म इंधन साठे मर्यादित आहेत.
२) दिवसेंदिवस इंधनाची मागणी वाढत आहे
३) साठा मर्यादित असल्यामुळे अपव्यय टाळायला हवा.
ऊ. वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे ?
उत्तर -
१) वाढत्या शहरीकरणामुळे जंगलतोड वाढत आहे.
२) शिकारीमुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी होत आहे
ए. पाच खनिजांची नावे व त्यांपासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा.
उत्तर -
लोहखनिज : टाचणीपासून ते अवजड उद्योगधंद्यांपर्यंत विविध साहित्यनिर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते. उदाहरणार्थ, शेतीची अवजारे, रेल्वे रूळ इत्यादी.
मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट, सिडेराईट ही चार प्रमुख लोहखनिजे आहेत.
2. मँगनीज: मँगनीजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. विदयुत उपकरणांमध्येही मँगनीज वापरले जाते.
3. बॉक्साईट : अॅल्युमिनिअम हा उत्तम वीजवाहक व उष्णतावाहक आहे. त्याची घनता कमी आहे, त्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने, विदयुत तारा यांमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
4. तांबे : तांबे हे शीघ्र विदयुतवाहक आहे, त्यामुळे विजेच्या रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती तारा, निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो.
5. अभ्रक : अभ्रक हे विदयुतरोधक असून त्याच्या थरांच्या जाडीवर त्याची किंमत ठरते. औषधे, रंग, विदयुतयंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर करण्यात येतो.
ऐ. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे लिहा.
उत्तर - धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे : निष्कर्षण व शुद्धीकरण
3. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत.
उत्तर -
१) नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित असल्याने तिचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा .
२) पर्यायी ऊर्जास्त्रोत वापरावे.
३) सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर करायला हवा.
४)नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गांनी साधनसंपदा वाढेल त्याचा अवलंब करावा,
उदा. वनीकरण
4. खालील ओघतक्ता पूर्ण करा
5. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे ?
उत्तर -
१) देशातून खनिजे, जीवाश्म इंधने, नैसर्गिक वायू यांची निर्यात होते यामुळे देशाला परकीय चलन मिळते
२) निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होते.
6. तुमच्या शाळेच्या परिसरात, घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल? का?
उत्तर -
तुळस, कडुनिंब, आवळा, हिरडा, बेहडा, अश्वगंधा, अडुळसा , ओवा या वनस्पतीमध्ये उपयोगी औषधी गुणधर्म आहेत.
0 Comments