अ' गट
1. स्टेनलेस स्टील - संमिश्र
2. चांदी - धातू
3. भाजणीचे दळण - मिश्रण
4. मीठ - संयुग
5. कोळसा - मूलद्रव्य
6. हायड्रोजन - अधातू
2. Zn, Cd, Xe, Br, Ti, Cu, Fe, Si, Ir, Pt या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा.
उत्तर -
(1) Zn - झिंक
(2) Cd - कॅडमिअम
(3) Xe - झेनॉन
(4) Br - ब्रोमिन
(5) Ti - टीटानिअम
(6) Cu - कॉपर/तांबे
(7) Fe - आयर्न / लोह
(8) Si - सिलिकॉन
(9) Ir - इरिडिअम
(10) Pt -प्लॅटिनम
3. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत ?
हायड्रोक्लोरिक आम्ल - HCI
सल्फ्युरिक आम्ल - H2SO4
सोडिअम क्लोराईड - NaCl
ग्लुकोज - C6H1206
मिथेन - CH4
4. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.
उत्तर -
लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते.
ताकात घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने लोण्याचे कण एकत्र येऊन त्याचा गोळा बनतो.
आ. रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.
उत्तर -
पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते. पाण्यातील मिश्रणाचे घटकपदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळण कागदाला चिकटून राहतील. म्हणून रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.
इ. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.
उत्तर -
पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कापडातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते. बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते. त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.
फरक स्पष्ट करा.
अ. धातू आणि अधातू
धातू
1. धातूंना चकाकी असते.
2. धातू वर्धनीय असतात.
3. धातूंना तन्यता असते.
4. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात.
5. सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात. (अपवाद - पारा.)
6. सामान्यत: धातूंची घनता उच्च असते. उदा., सोने, चांदी, पारा.
अधातू
1. अधातू चकाकत नाहीत.
2. अधातू वर्धनीय नसतात.
3. अधातूंना तन्यता नसते.
4. अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात.
5. सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ( अपवाद - ब्रोमीन द्रव.)
6. सर्वसाधारणपणे अधातूंची घनता कमी असते. उदा., ऑक्सिजन, हायड्रोजन.
आ. मिश्रणे आणि संयुगे
मिश्रणे
1. दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते.
2. मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात.
3. मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. उदा., हवा, स्टील.
संयुगे
1. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते.
2. संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या भौतिक पद्धतीने वेगळी करता येत नाहीत.
3. संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. उदा., मीठ, साखर, पाणी.
इ. अणू आणि रेणू
अणू
1. मूलद्रव्याचा सर्वांत लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात, त्याला अणू असे म्हणतात.
2. अणूचे विभाजन सहज शक्य नसते. त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात.
3. अणू एकत्र आल्यास रेणू बनतो.
रेणू
1. रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो. त्याला स्वतःचे गुणधर्म असतात.
2. रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो. उदा., पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे रेणू तयार करता येतात.
3. रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते.
ई. विलगीकरण व ऊर्ध्वपातन
विलगीकरण
1. एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात.
2. या पद्धतीत उष्णता दयावी लागत नाही.
ऊर्ध्वपातन
1. द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते.
2. या पद्धतीत उष्णता दयावी लागते.
6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात ?
उत्तर -
एखादया पदार्थामध्ये अनावश्यक व हानिकारक असा दुसरा पदार्थ मिसळला, तर तयार होणारे मिश्रण हे उपयुक्त राहत नाही. अशा वेळी आपण मिश्रणांतून आपल्याला अनावश्यक असणारे घटक वेगळे करतो. त्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे तसेच संप्लवन यांसारख्या सहज, सोप्या पद्धतींचा वापर केला जातो.
आ. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो ?
उत्तर -
मूलद्रव्ये-धातू - लोह, सोने, चांदी, तांबे.
अधातू - कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन.
संयुगे - साखर, मीठ, तेल.
मिश्रणे - साबण, संमिश्र (स्टील, पोलाद, दागिन्यातील सोने)
इ. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो ?
उत्तर -
अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जात नाही. त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते. अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठरावीक आकाराचे कण वेगळे केले जातात.
उदा. ताक करणे. परंतु ताक करताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही. रवीचा वापर केला जातो. रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात.
ई. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो? का?
उत्तर -
१) अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठीसुद्धा ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो
उदा. समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करणे
२) एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्यांचे दोन थर स्पष्ट दिसतात. मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असेल तो खाली राहतो, तर हलका द्रव त्याच्यावर तरंगतो. या गुणधर्माचा उपयोग करून मिश्रणातील दोन द्रव वेगळे करता येतात.
उदा. केरोसीन व पाणी यांचे मिश्रण विलग करणे.
उ. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर
१) ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत. संघननी नलिका योग्य रितीने थंड राहीली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठरावीक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे.
२) विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड-बंद ता आली पाहिजे.
0 Comments