प्रश्न 2. खालील दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारांत मोडतात ? कसे ?
1 ) दुधाचे दही होणे.
उत्तर :
रासायनिक बदल या प्रकारात मोडते. दुधापासून नवीन पदार्थ म्हणजे दही तयार होते
म्हणून हा रासायनिक बदल होय.
2 ) फटाका फुटणे.
उत्तर :
रासायनिक बदल या प्रकारात मोडते. फटाका फुटल्यावर मूळ पदार्थ बदलतो.
3) भूकंप होणे.
उत्तर :
अनावर्ती बदल या प्रकारात मोडते. भूकंप हा ठरावीक कालावधीत घडून येत नाही.
4) पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण.
उत्तर :
आवर्ती बदल या प्रकारात मोडते. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हे ठरावीक कालावधीत
घडून येते.
5) स्प्रिंग ताणणे.
उत्तर :
भौतिक बदल या प्रकारात मोडते. स्प्रिंग ताणल्यावर त्याच्या मूळ स्वरूपात काहीही
बदल होत नाही.
प्रश्न 3. कारणे लिहा.
1) हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून
घ्यावी.
उत्तर :
i) हवाबंद अन्नपदार्थ कोणत्या वेळी तयार केले आहे याची माहिती आपल्याला त्या
वेष्टनावरील मुदतीच्या तारखेने माहीत होईल.
ii) हवाबंद अन्नपदार्थ टिकविण्यासाठी परिरक्षकांचा वापर केला जातो. हे परिरक्षक फार
काळ हवाबंद राहिले तर रासायनिक क्रिया घडते. असे अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे
अन्नविषबाधा होऊ शकते. ठरावीक कालावधीत हे अन्न खाणे योग्य आहे. म्हणून
हवाबंद अन्नपदार्थ विकत घेतांना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून
घ्यावी.
2 ) लोखंडी वस्तूस रंग लावावा.
उत्तर :
कारण - i) परिसरातील वायू, रसायनांच्या वाफा हवेतील आर्द्रता यांमुळे लोखंडाची वस्तू
गंजते. त्यावर विटकरी रंगाचा थर जमतो. म्हणजे लोखंडाचे क्षरण होते.
ii) धातूंचे प्रमाणाबाहेर क्षरण झाले तर धातूंच्या वस्तू कमकुवत आणि निकामी होतात.
जर लोखंडी वस्तूस रंग लावला तर त्या वस्तूचे क्षरण होणार नाही ते दीर्घकाळ टिकेल.
म्हणून लोखंडी वस्तूस रंग लावावा.
3) तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.
उत्तर :
कारण - i) हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांमुळे तांबे, पितळ अशा
प्रकारच्या भांड्यांवर हिरवट रंगाचा थर तयार होतो.
ii) या धातूंचे हळूहळू क्षरण होते. प्रमाणाबाहेर क्षरण झाले तर या धातूंच्या वस्तू
कमकुवत आणि निकामी होतात.
iii) या धातूंचे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कथिलाचा लेप
देतात. याला कल्हई म्हणतात. म्हणून तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई
करावी.
4) कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होता, परंतु ओला रुमाल वाळण्यास
वेळ लागतो.
उत्तर :
कारण - i) जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र होणारे बदल म्हणतात. तर जे बदल घडून येण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यास सावकाश होणारा बदल असे म्हणतात.
ii) कोरडा रुमाल पाण्यात बुडवण्याचा कालावधी हा कमी असतो. हा शीघ्र होणारा बदल आहे. परंतु ओला रुमाल वाळण्याच्या क्रियेला अधिक कालावधी लागतो. हा सावकाश
होणारा बदल आहे. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.
प्रश्न 4. कशाचा विचार कराल ?
1) पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे.
उत्तर :
पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. तर हा बदल घडताना मूळ पदार्थ
आहे तसाच आहे का याचा विचार करू. तसेच त्या पदार्थांपासून कोणताही नवीन पदार्थ
तयार होत नाही याचा विचार करू.
2) पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे.
उत्तर :
पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. तर त्यामध्ये बदल घडल्याने
मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थांत होत आहे का याचा विचार करू.
तसेच आधीच्या पदार्थापासून नवीन वेगळा पदार्थ तयार झाला का याचा विचार करू.
प्रश्न. 5. परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा.
संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता.
झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी
खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणीक
भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुन्य खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस
सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत
होता.
उत्तर :
i) आवर्ती बदल
ii) भौतिक बदल
iii) रासायनिक बदल
iv) अनावर्ती बदल
0 Comments