19.मले बाजाराला जायाचं बाई.

 

स्वाध्याय  



प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.




(अ)        बाजाराला जायचे नाही असे बाई का म्‍हणतात?

उत्तर: बाजारात वस्तू खरेदी केल्यावर त्या प्लास्टिक ची पिशव्यांमधून घरी आणाव्या लागतात. वस्तू डब्यांत ओतल्यावर प्लास्टिक च्या पिशव्या फेकून द्याव्या लागतात, आणि त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाल्या तुडुंब भारतात. म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात.



(आ)     कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते?

उत्तर: कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाल्या तुडुंब भारतात. जनावरे त्या पिशव्या चारा म्हणून खातात आणि मृत्युमुखी पडतात. समुद्रकिनार्यावरचा कासावांसारखे जलचर मारतात. शेतात पिक येत नाही. कॅरीबॅगपासून सजीवांना धोका आहे.




(इ)   बाईच्या हरणीचे मरण का ओढवले?

उत्तर: बाईची हरीण नाव असलेली म्हैस होती. तिने चारा समजून प्लास्टिकच्या पिशव्या चघळल्या त्या पोटात गेल्या म्हणून बाईच्या हरिणीचे मरण ओढावले.


प्र. २. असे का घडले?




(अ) काळी माय ओसाड झाली.

उत्तर: नांगरलेल्या जमिनीमध्ये प्लास्टिकची जाळी अडकते. शेतात पिक येईनासे होते. म्हणून काळी माय ओसाड झाली.




(आ)     सरकारने आदेश काढून संदेश दिला.

उत्तर: प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे जनावरांचे मरण ओढवते.    शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला.




(इ)  समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.

उत्तर: समुद्रतील जलचरांना पाण्यात फेकलेल्या प्लास्टिक चा विळखा बसल्याने समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.




(ई)    बाई बाजाराला जायला तयार झाल्या.

उत्तर: प्लास्टिक ची पिशवी वापराची नाही. त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्याचे प्रतिज्ञापूर्वक ठरले; म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाल्या.

 


प्र. ३. कोण, कोणास व का म्हणाले?




(अ)        ‘सांग रे बाबा सांग. मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय?’

उत्तर: असे तिसरा पहिल्याला म्हणाला. कारण: सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला हे पहिल्याने सांगितले’ त्यावर तिसऱ्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारले.



(आ)     ‘प्लॅस्टिकची जाळी वरती आली.’

उत्तर: असे बाई तिसऱ्याला म्हणाली.कारण: तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते. हे बाईला विचारले तेव्हा बाई तिसऱ्याव्यक्तीला असे म्हणाली.


प्र. ४. कोणकोणत्या प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल? याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा.

उत्तर:


१)   संपलेल्या तेलाच्या डब्याला कापून त्याचा झाडलावण्याची कुंडी म्हणून वापर करता येईल.


२)   प्लास्टिक च्या जाड पिशव्या धुवून पुन्हा पुन्हा वापराव्यात.


३)   प्लास्टिक चे तुटलेले घामेल्यंत माती भरून शोभेची झाडे लावणे.


४)   प्लास्टिक च्या दोरीचा वापर अनेकदा करता येईल.


५)   प्लास्टिक चे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणारे जाड ग्लास.


 


प्र. ५. तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लॅस्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही, काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा.

उत्तर:


दुकानदार: (काकांना) अहो रामू काका तुमचा सगळा जिन्नस तयार आहे. जिन्नस भरायला पिशवी द्या.


काका: (दुकानदारला) अहो मी पिशवी आणली नाही. तुम्ही तुमच्याकडे असणारी एखादी प्लास्टिक ची पिशवी मला विकत द्या आणी त्यात हा सगळा जिन्नस भरा.


मी: (दुकानदाराला) अहो काका काय करताय तुम्ही?  त्यांनी तुमच्याकडे प्लास्टिक ची पिशवी मागितली आणि तुम्ही ती लगेच देताय?


दुकानदार: का रे मुला? काय झाले.


मी: अहो तुम्हाला माहित नाही का सध्या प्लास्टिक पिशवी वापरावर सरकारने बंदी आणली आहे.


काका: पण अरे मला हे समजत नाही की प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी का आणली. माणसं बाजारातून घरी समान कस काय घेऊन जाणार?


मी: अहो काका, प्लास्टिक पिशव्या वापरून फेकून दिल्याने त्या पिशव्यांचे विघटन होत नाही. त्या पर्यावरणात वर्षानुवर्षे ताशाचा टिकून राहत . कधी कधी या पिशव्या गटारांत अडकून पडल्याने गटारे तुंबतात, रोगराई पसरते,जर प्राण्यांनी ह्या पिशव्या खाल्ल्या तर त्यांच्यावर मृत्यू ओढवू शकतो. आणि राहिला प्रश्न आत्ता समान घरी घेऊन जायचा तर घरातून येताना कापडी पिशवीचा वापर करावा. किंवा कापडी पिशवी तुम्ही दुकानातून विकत घेऊ शकता.


दुकानदार: अरे मुला मला तुझे म्हणणे पटले आहे. अहो रामुकाका तुम्हांला मी कापडाची पिशवी विकत देतो.


काका: हो चालेल , आज पासून मी ही प्लास्टिक च्या पिशव्या वापरणार नाही.


दुकानदार : हो आणि मी ही कोणाला प्लास्टिक पिशव्या विकणार नाही.


 

 


प्र. ६. ओला कचरा व सुका कचरा यांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चाकरा व त्यांची यादी तयार करा.

उत्तर:


ओला कचरा.


१)भाज्यांचे देठ.


२)फळाच्या साली.


३)उरलेले जेवण.


४)ओला पालापाचोळा.


५)खराब झालेल्या भाज्या.


सुका कचरा.


१)कागदाचे तुकडे.


२)टाकावू वस्तू.


३)प्लास्टिक च्या वस्तू.


४) झाडाची सुकी पाने.


५) प्लास्टिक पिशव्या.



प्र. ७. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा.

उत्तर:


प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने पुढील फायदे होतील.


१)   जमिनी सुपीकता बिघडणार नाही.


२)   पावसाळ्यांत गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येणार नाही.


३)   प्लास्टिक खाऊन प्राण्यांचा मृत्यू होणार नाही.


४)   रोगराई पसणार नाही.


५)   समुद्रातील जलचरांचा जीव धोक्यात येणार नाही. 


६)   मृदा प्रदूषित होणार नाही.


७)   प्लास्टिक पिशव्या जाळल्याने होणारे वायू प्रदूषण थांबेल.

 


प्र. ८. शाळा-शाळांमधून प्लॅस्टिक कचरामुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा.

उत्तर: १) कागदाच्या पिशव्या. २) प्लास्टिक बॉटल ३) खाऊचे प्लास्टिक कागद ४) खराब झालेली प्लास्टिक खेळणी ५) प्लास्टिक दोऱ्या, आणि खराब प्लास्टिक वस्तू.



खेळूया शब्दांशी.


(अ) खालील शब्द प्रमाणभाषेत लिहा.


(१) न्हाई = नाही.


(२) सौंसाराला = संसाराला


(३) म्हंजी = म्हणजे.


(४) समद्या = सगळ्या.


(५) म्हन्ते = म्हणते.


(६) माजी = माझी.


(७) त्येच्यासाठी = त्याच्यासाठी.


 (८) डोल्यातून = डोळ्यातून.


(९) यवढंच = एवढंच


(१०) हाय = आहे.


(११) व्हय = होय.


 (१२) त्यो = तो.


 

(आ) खालील वाक्य वाचा.


माझी आजी अंगठाबहाद्‌दर आहे. अंगठाबहाद‌द्र म्‍हणजे अशिक्षित. तसे खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.



(१)  अकलेचा कांदा - मूर्ख मनुष्य.

वाक्य:  शुभम अकलेचा कांदा आहे. कधी काय करेल याचा नेम नाही.




(२)  उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्‍ला देणारा.

वाक्य:  वृक्षारोपण करण्यासाठी आधी माळरानावरची झाडे तोडून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी जागा तयार करा असे सांगणारा माणूस म्हणजे उंटावरचा शहाणा.



(३) उंबराचे फूल - क्‍वचित भेटणारी व्यक्‍ती.

वाक्य:  दहावीनंतर केदार शिक्षणासाठी शहरात गेला. तो कधी तरी गावाला येतो त्यामुळे तो जणू उंबराचे फुलच झाला आहे.




(४)   एरंडाचे गुऱ्हाळ - कंटाळवाणे भाषण करणे.

वाक्य:  सभेत बोलायची संधी काय मिळाली तर राजाराम भाऊंनी एरंडाचे गुऱ्हाळ चालू केले.




(५)  कळीचा नारद - भांडणे लावणारा.

वाक्य:  गावातील रामू हा कळीचा नारद आहे.



(६)  गळ्यातला ताईत - अतिशय प्रिय.

वाक्य:  आमच्या वर्गातली राणी इंग्रजी विषयाच्या बाईंच्या गळ्यातील ताईत झाली आहे



(७) जमदग्‍नी - अतिशय रागीट मनुष्य.

वाक्य:  राजूचा स्वभाव म्हणजे अगदी जमदग्‍नीच.




(८)  झाकले माणिक - साधा पण गुणी मनुष्य.

वाक्य:  शाम वर्गात पहिला येईल असे कोणालाच वाटले नव्हते, शाम अगदी झाकल्या माणकासारखा आहे.




(९) दीड शहाणा - मूर्ख.

वाक्य:  शामू सारखा दीड शहाणा माणूस मी आजवर पहिला नाही.




(१०)  लंकेची पार्वती - अंगावर दागिने नसलेली स्‍त्री.

वाक्य:  लग्नात सोन्याने मढलेली स्वप्नाली लग्न होऊन सहा महिने झाले नाही तोपर्यंत लंकेची पार्वती झाली.

 


खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) संध्या गीत गात असते.


(२) रोहिणी चित्र रंगवत असते.


(३) आई उत्तम पदार्थ बनवत असते.


 

खालील तक्ता पूर्ण करा.

( हा तक्ता पाहण्यासठी मोबाईल (TilT)आडवा करा.)

अ.क्र.


साधा वर्तमानकाळ


अपूर्ण वर्तमानकाळ


पूर्ण वर्तमानकाळ


१.


आजी भाजी विकते.


आजी भाजी विकत आहे.


आजीने भाजी विकली आहे.


२.


सोनार दागिने घडवतो.


सोनार दागिने घडवत आहे.


सोनाराने दागिना घडवला आहे.


३.


आज पाऊस आला.


आज पाऊस येत आहे.


आज पाऊस आला आहे.


४.


अजय सहलीला जातो.


अजय सहलीला जात आहे.


अजय सहलीला गेला आहे.


५.


आई बाळाला भात भरवते.


आई बाळाला भात भरवत आहे.


आईने बाळाला भात भरवला आहे.


 

खालील चौकटींत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.


न आवडणाऱ्या माणसाने


कितीही चांगली गोष्ट केली,


तरी ती वाईट दिसते. त्या


व्यक्तीचे काम आवडत नाही.


उत्तर: नावडतिचे मीठ अळणी


 


एखादी गोष्ट तात्काळ व्हावी


याकरिता काही लोक


उतावळेपणाने जे उपाय


करतात त्यांना हे म्हटले जाते.


उत्तर: उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.


 


एखाद्या माणसाला काम


करता येत नसले, की तो


कारणे देत असतो.


उत्तर: नाचता येईना अंगार वाकडे


 


जे समोर दिसते त्यासाठी


कोणत्याही पुराव्याची गरज


भासत नसते.


उत्तर: हातच्या कंकणाला आरसा कशाला.

Post a Comment

0 Comments