स्वाध्याय.
प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे?
उत्तर: गुलाबाच्या आजूबाजूला असंख्य काटे असतात. पण गुलाब कधी आसपास असणाऱ्या काट्यांना दोष देत नाही.
(आ) ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो?
उत्तर: ग्रीष्म हृतुमध्ये कडक उन पडत असल्याने. कडक उन्हामुळे धरणी भाजून निघते
(इ) निराश-आशा कवीला कोणाबद्दल वाटते?
उत्तर: आकाशाचे रंग रोज बदलतात, आकाशात ढग दाटून येतात त्यामुळे निराश-आशा कवीला नक्षत्रांबाबत वाटते.
(ई) सुख-दुःखाची ऊन-सावली म्हणजे काय?
उत्तर: कधी उन पडते तर कधी सावली असते. सुख दुखः ही तसेच असते. कधी आयुष्यात सुखाचे क्षण येतात तर कधी दुखाः च्या क्षणांना सामोरे जावे लागते.
(उ) आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात?
उत्तर: आयुष्य हे बहुमोल आहे. माणसाला आयुष्य एकदाच मिळते. म्हणून या बहुमोल अश्या आस्युष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात.
प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात?
उत्तर: १) निखळून पडणारी फुले तर्हीही न झडणारे झाड
२)काट्यांनी वेढलेले गुलाब.
३)ग्रीष्म हृतुत जाळणारी धरणी
४) रंग बदलणारे आकाश आणि दाटून येणारे ढग.
५) अमावस्या आणि पौर्णिमा.
६) सुखदुखः आणि उनसावली.
(आ) कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे?
उत्तर: आयुष्यात आपल्या मनासारखे सर्व घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुख दुखः असते ते भोगावेच लागते. संकटाला घाबरून कधीही बहुमूल्य अशा जीवनाचा कधी त्याग करू नये. माणसाला आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही ते एकदाच मिळते म्हणून न डगमगता न घाबरता समोर येणाऱ्या संकटाचा सामना करत आनंदाने जीवन जगावे. असा बहुमोल संदेश कवीने माणसाला दिला आहे.
प्र. ३. तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
(अ) तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता?
उत्तर: मी ठरवलेली गोष्ट ज्या वेळी घडत नाही तेव्हा मी निराश होऊन न जाताती गोष्ट होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. मी ठरवलेली गोष्ट का घडत नाही ती गोष्ट न घडण्यामागे कोणती कारणे आहेत? मी कुठे चुकतो आहे याचा विचार करतो आणि चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करतो.
(आ) ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात?
उत्तर: ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा मला वाटते की, वाटते की यावर्षी पाऊस पडेल का? दुष्काळ तर नाही पडणार ना? दुष्काळ पडला तर प्यायला आणि शेतीला पाणी कसे मिळणार. शेतकरी शेती कशी करणार . पाऊस पडायला लागेपर्यंत उपलब्ध असलेले पाणी जपून वापरायला हवे जेणेकरून पाऊस येईपर्यंत पाणी पुरेल
(इ) खूप ऊन लागू लागले, की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हांला काय वाटते?
उत्तर: खूप उन लागू लागल्यानंतर जेव्हा मी सावलीत जातो तेव्हा छान गारवा जाणवतो. सावलीत थोडा वेळ थांबल्याने सगळा थकवा निघून जातो. थंड हवेने उन्हामुळे तापलेले शरीर थंड होते. शरीराला तसेच मनाला आराम मिळतो. आणि पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद मिळते.
प्र. ४. या कवितेत मनासारखे काही घडते का? असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे, असे तुम्हांला वाटते? कल्पना करा व लिहा.
उत्तर: मला मनासारखे हवे तिकडे फिरावेसे वाटते.
मनासारखे खेळावेसे वाटते.
मनासारखा अभ्यास होऊन परीक्षेत चांगले गुण मिळावेसे वाटतात.
मनासारखे जेवण मिळावेसे वाटते.
(अ) या कवितेत सुखदुःख, ऊनसावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी पाच शब्द लिहा.
उत्तर: उंच-सखल
लांब-रुंद
खाली-वर
नफा-तोटा
आडवा-उभा
(आ) समानार्थी शब्द लिहा.
(अ) लतिका = वेल
(आ) धरणी = जमीन
(ई) देह = शरीर
(उ) नभ = आकाश
0 Comments