17.दुखणं बोटभर.

 


स्वाध्याय


प्र. १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.




(अ)        लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले?

उत्तर: एकदा कुठलातरी कडक गुळ बत्त्यान ठेचताना एक घाव चुकून उजवी आहाताच्या बोटावर बसला. लेखिकेच्या बोटाला दुखापत झाली . घाव बसताच वेदना झाल्याने लेखिकेने बोट तोंडात घातले. नंतर त्या ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले. बोटाला गरम पाण्याने शेक दिला. बोट फुगल्यावर लेखिकेने बोटाला तेलमालिश केले. शेवटी बोट बरे न झाल्याने डॉक्टरांना फोन केला.




(आ)     ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे?

उत्तर: लेखिकेने बोटावर मलम लावले.पण बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बोटाला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताठले होते. त्याचा ताठ कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकावले  तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला !शेवटी त्या बोटाला तेलाने मालिश करूनसुद्धा त्याचा ताठपणा कमी झाला नाही. अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन केले आहे.




(इ)            बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला?

उत्तर: डॉक्टरांनी लेखिकेच्या बोटाला स्ट्रॅपिंग केले . त्यामुळे लेखिकेला कामावर रजा टाकून घरी बसावे लागले. सर्व कामे डाव्या हाताने करावी लागली. केस विंचरण, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट लेखिकेला जमत नव्हते. असा परिणाम लेखिकेच्या बोटावर लागल्याने लेखिकेच्या कामावर झाला.


प्र. २. का ते लिहा.




(अ)        लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली.

उत्तर: बोट बरे होण्यासाठी तीन महिने खर्च करावा लागला, तसेच तीन महिन्याचा वेळ वाया गेला यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली .




(आ)     लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली.

उत्तर: लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले; पण लेखिकेचे बोट काही बरे झाले नाही. शेवटी लेखिकेच्या भाच्याने डॉक्टरांना फोर करण्याचा सल्ला दिला. अतेव्हा लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली.




(इ)            दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला.

उत्तर: दवाखान्यात कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात असलेले रुग्ण पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला.




(ई)             दवाखान्यातून लेखिका जड अंतःकरणाने घरी परतली.

उत्तर: डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले. त्या प्रकारात त्यांनी दुखऱ्या बोताबरोबर आजूबाजूची दोन बोटे सुद्धा ताणून बांधली आणि हातही गळ्यांत अडकवला. आणि त्यासाठी खर्च झाल्याने लेखिकेची पर्स हलकी झाली होती त्यामुळे दवाखान्यातून लेखिका जड अंतः करणाने घरी परतली.




(उ)           लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे.

उत्तर: बोटाच दुखण बर झाल तर्हीही लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नव्हती. कितीही राग आला तरी मुठ घट्ट वळवू शकत नव्हती. बोटाशिवाय कोणतेही काम करणे हे अवघड आहे. हे लेखिकेला कळताच लेखिकेला बोटाचे महत्व समजले.


प्र. ३. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली, तर तुम्ही त्याला कशी मदत कराल?

उत्तर: 


            आमच्या वर्गमित्राला जर दुखापत झाली तर, त्याला प्रथम प्रथमोपचार करू. आणि शक्य तितक्या लवकर त्याला वैद्याकीय मदत मिळवून देऊ. दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यास त्याला आम्ही धीर देत राहू  जेणेकरून तो लवकर बरा होईल. त्याला वेळच्या वेळी औषधे आणि गोळ्या घेण्यास सांगू. त्याच्ध्ये वेदनेकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून त्याला शाळेतल्या गमतीदार गोष्टी सांगू . त्याला शाळेत यायला जमत नसल्यास आम्ही त्याला शाळेत सरांनी शिकवलेला अभ्यास त्याला तो बरा झाल्यावर समजावून सांगू. अशा प्रकारे आम्ही त्याला मदत करू.


 


 


प्र. ४. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा.

उत्तर:


१)   गुल फोडताना बात्त्याचा घाव बोटावर बसला.


२)   वेदना सहन न होऊन लेखिकेने बोट तोंडात घातले.


३)   बोटाची ठसठस कमी व्हावी म्हणून बोटावर मलम लावली.


४)   फुगलेले बोट कमी व्हावे म्हणून गरम पाण्याने शेकले.


५)   बोटाचा ताठ पणा कमी व्हावा म्हणून तेलमालिश केले.


६)   भाच्याच्या सल्ल्याने डोंक्टारांकडे जाणे.


७)   डॉक्टरांनी हात गळ्यात अडकवला.


८)   डाव्या हाताने कामे काही निट होईनात.


९)   स्ट्रॅपिंग निघाल्यावरही बोट काही बरे झालेच नाही. 


१०)   कामावर हजर


११)   लेखिकेला बोटाचे महत्व समजले.


 


प्र. ५. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा-बारा ओळी लिहा.

उत्तर:


             एकदा फळे कापत असताना माझे बोट अचानक कापले . अचानक माझ्याशी कोणीतरी बोलल्याचा भास झाला. पहिले तर माझे बोटच माझ्याशी बोलत होते. ते पुढे माझ्याशी बोलू लागले. अरे मित्रा मला खूप वेदना होतायत. माझ्यातून रक्ताच्या धाराच सुरु झाल्यात . तुलाही खूप वेदना होत असतील ना? तू किती वेंधळा रे मोबाईल वर बोलता बोलता फळ कापायला गेलास आणि चुकून माझ्यावर सुरी चालवलीस. आत्ता घाबरून जाऊ नको कापलेल्या जागेवर कपाटात असलेल्या प्रथमोपचार पेटीमधले औषध लाव आणि मला घट्ट कापडाने बांधून ठेव त्यामुळे रक्तप्रवाह थांबेल. आणि हो आईला सांगून डॉक्टरांकडे मला घेऊन चल मग ते माझ्यावर मलमपट्टी करतील त्यामुळे मी लगेच बरा होईन आणि तुलाही बरे वाटेल.


 


प्र. ६. तुम्हांला ठेच लागून जखम झाली तर.... काय कराल ते लिहा.

उत्तर: मला ठेच लागून जखम झाली तर . मी घरी जाऊन जखम सर्वप्रथम स्वच्छपाण्याने स्वच्छ करून घेईन आणि त्यावर आईच्या मदतीने प्रथमोपचार पेटीतील जखमेवर लावायचे औषध लावून ठेच लागलेले बोट पट्टीने बांधून ठेवेन. योग्य वेळी त्याचे औषध बदलेन . जर तरीही बोट बरे झाले नाही तर डॉक्टरांकडे जाईन.


 


(अ) खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा.


(अ) वहिनी – भावजय


(आ) कथा – कहाणी


(इ) आघात – घाव


(ई) ललाट – कपाळ


(उ) त्रास – दुखण


(ऊ) सकाळ – प्रभात


(ए) नवल –आश्चर्य


(ऐ) तोरा – मानी


(ओ)हात – कर


 




(आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.


(अ) गरम x थंड


 (आ) उजवा x डावा


(इ) घट्ट x सैल


(ई) दुर्लक्ष x लक्षपूर्वक


 


(इ) वाक्यांत उपयोग करा.




(अ) वायफळ चर्चा –


वाक्य: मिटिंगमध्ये लोक मुख्य मुद्दा सौडून वायफळ चर्चा करीत करीत होते. 




(अ)        ठसठसणे –


वाक्य: काल राणी चे बोट कापल्याने ठसठसत होते.




(आ)     बाळबोध –


वाक्य: पोटात गेलेल्या गोळ्यांनी बोट कसे काय बरे होणार अशी लेखिकेला बालपणापासून बाळबोध शंका आहे.




(इ)            जड अंतःकरण –


वाक्य: आईवडिलांनी जड अंतःकरणाने राजूला शिक्षणासाठी दूर पाठवले.




(ई)            बट्ट्याबोळ –


वाक्य: बोटाला दुखापत झाल्याने राजूच्या सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ झाला.




(उ)           हत्तीच्या पावलांनी येणे –


वाक्य: आईने हाक मारल्यावर राम हत्तीच्या पावलांनी चालत होता.


 


(ए) मुंगीच्या पावलांनी जाणे –


वाक्य: श्यामचा ताप मुंगीच्या पावलांनी कमी झाला.


 


(ऐे) जायबंदी –


वाक्य: सीमेवर लढताना अनेक सैनिक जायबंदी झाले.





खेळूया शब्दांशी.


 (ई) ‘हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड’ यासारखे यमक जुळवून खालील वाक्येलिहा.


(अ) त्याचा खिसा गरम, पगाराच्या पहिल्या आठवड्यातच झाला नरम.


(आ) मोडेन पण वाकणार नाही, सत्याची बाजू कधी सोडणार नाही.


(इ) बोटभर दुखणं, -------


(ई) मनावरचा उतरला ताण, आत्ता नाही होणार हैराण.




(ऊ)         ‘हाडबिड’ यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा.


उत्तर: हातपाय, पाठपोट केसबिस, डोळेबिळे




(ऋ)        गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा.


उत्तर: गच्च, अख्खी, किल्ला, चिठ्ठी, गुड्डी, अण्णा, गप्प, धम्म.


 

(ऐ) ‘बोट’ याप्रमाणे ‘हात’ व ‘पोट’ यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा.

उत्तर:


वाक्प्रचार


पोट


पोटात गोळा येणे


पोटात घेणे.


पोटात शिरणे


पोट भरणे.


हात


हातावर तुरी देणे


हात देणे


हात दाखवणे


हात कपाळाला लावणे




(अ)        या पाठातील विनोदी वाक्ये शोधून लिहा.


उत्तर: १) कळ लागल्यामुळे आणी बोट वळवायची नसल्याने मी आपली नुसतीच कळवळायची.


१)   आत पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बर करायचं की पोट हे ही, कस काय समजत असावं?




(आ)     पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा. 

उत्तर:

 बोट


ठसठसणारे


उजवे


एकच


टम्म




·       पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा.

(१) आई भाकरी करते. = सकर्मक


(२) गणेश रस्त्यात पडला.= अकर्मक


 (३) उद्या दिवाळी आहे. = अकर्मक


(४) अनुराधा पत्र लिहिते.=सकर्मक


(५) सुरेखाचे डोके दुखते.=सकर्मक


(६) गाई झाडाखाली बसल्या.=अकर्मक  

Post a Comment

0 Comments