16.सफर मेट्रोची

 


प्र . १


अ ) मेट्रो पायलट होण्यासाठी अगोदर इंजिनियर व्हावे लागते , नंतर चाचणी परीक्षा द्यावी लागते . यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते नंतर मुलाखतीत निवड झाल्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याची प्रशिक्षण दिले जाते , यानंतर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो .


आ ) पहिल्यांदा मेट्रो चालवताना तिच्या मनात थोडीशी भीती होती .सर्वांना ती नीट घेऊन जाईल की नाही असे विचार तिच्या मनात येत होते . पण एकदा रूपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातली भीती दूर झाली नंतर न घाबरता आत्मविश्वासाने रूपालीने मेट्रो चालवली .


इ ) मेट्रो ही पहिल्यांदाच लावणार होती व तिची पहिली महिला सारखी रूपाली झाली . मेट्रोमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,अनेक मान्यवर मंडळी , मीडियाचे लोक तसेच रूपालीच्या सुद्धा घरची सर्व मंडळी उपस्थित होती या सर्वांना रूपाली मेट्रो मधून घेऊन जाणार होती .आणि म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रूपालीसाठी अविस्मरणीय झाला होता .


प्र.२


अ ) केबिन -

केबिनमध्ये मेट्रो चालवणारा पायलट असतो केबिन ही मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा सुद्धा बसवलेली असते .


आ ) कॅमेरे -

मेट्रोच्या डब्यात व स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात .हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लावलेले असतात .


इ ) मेट्रोचा प्रवास -

मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व आल्हाददायक आहे . पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो . तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा वाटतो .मेट्रो मधून प्रवास करण्यासाठी टोकन म्हणजेच मेट्रोचे तिकीट मिळते .तसेच रोज मेट्रो ने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते मेट्रो ने प्रवास करतेवेळी टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते .


ई ) जिने -

प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात .


उ )दरवाजे -

मेट्रोचे दरवाजे हे स्टेशन आल्यावर आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात .टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात . मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते .


ऊ )प्रवासी संख्या -

मेट्रोमध्ये एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात .


ए ) इंजिन -

मेट्रोला दोन्ही बाजूला इंजिन असते . इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते .


ऐ ) तिकिट -

मेट्रो ने प्रवास करतेवेळी टोकन दिले जाते .मेट्रोचे टोकन म्हणजेच तिकीट होय .दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते प्रीपेड कार्ड मध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात .प्रवास करताना टोकन किंवा प्रीपेड कार्ड महत्त्वाचे असते .


प्र.३


मेट्रोची वैशिष्ट्ये -

१)अत्याधुनिक यंत्रणा

२ )स्टेनलेस स्टीलचे डबे

३ )वातानुकूलित चार डबे .

४)सीसीटीव्ही कॅमेरे

५ )पंधराशे प्रवाशांची सोय .


(टीप -प्रश्न क्रमांक चार ते सहा हे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार लिहावयाचे आहेत . )


प्र. ४. मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा.
उत्तर:

मी मेट्रो बोलत आहे.

        मी माझ्या बाबांबरोबर मेट्रोने प्रवास करत असताना अचानक कोणी तरी मला हाक मारल्याचा आवाज आला वळून पहिले तर कोणी नव्हते. तेवढ्यात पुन्हा आवाज आला तेव्हा काय आश्चर्य चक्क मेट्रोच माझ्याशी बोलत होती. ती पुढे बोलू लागली.

        मित्रा तुझे खूप खूप स्वागत आहे. आधुनिक जगाच्या आधुनिक ट्रेन मध्ये तू प्रवास करत आहेस. माझा प्रवास हा सर्वांना हवा हवासा वाटतो. मी सर्वांना आरामदायी सेवा देते. इतर रेल्वे गाड्यांपेक्षा माझा वेग हा खूप असतो. आणि मी कोणतेही प्रदूषण करीत नाही कारण मी इंधन म्हणून विजेचा वापर करते. मला बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. माझे दरवाजे स्टेशन आल्यावर आपोआप उघडतात. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी स्टेशनवर , सी.सी.टीव्ही लावले गेले आहेत. आधुनिक तिकीट प्रक्रियेमुळे माझ्यातून प्रवास करताना कोणीच विनातिकीट प्रवास करू शकत नाही. आहे की नाही गंमत! माझ्यामुळे प्रवाश्यांचा विनाकारण वाया जाणारा प्रवासाचा वेळ वाचतो शिवाय त्यांचा प्रवास आनादायी आणि सुखकारक होतो.

        मेट्रो माझ्याशी बोलत असतानाचा आमचे स्टेशन आले दरवाजे आपोआप उघडले आणि आम्ही मेट्रोचा निरोप घेतला.

 

प्र. ५. तुम्हांला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल? का ते सांगा.
उत्तर: मला मोठे झाल्यावर बस चालवायला खूप आवडेल. कारण मी लहान पानापासूनच बस ने प्रवास करीत असल्याने मला तेव्हापासूनच बस चालवण्याचे खूप आकर्षण आहे.  बस घेऊन प्रत्येक प्रवाश्याला त्याच्या गावी नेऊन सोडणे आणि गावातील प्रवाश्यांना शहरात घेऊन येणे. मला खूप आवडेल.

 

प्र. ६. तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस.टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्‍न तयार करा
उत्तर: रिक्षाचालक प्रश्न

१)   तुम्ही रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतलेत?

२)   रिक्षा चावण्यासाठी कोण कोणत्या पायऱ्या पार कराव्या लागतात?

३)   रिक्षा चावण्यासाठी कोणत्या इंधनाची आवश्यकता असते?

४)   तुम्ही रिक्षा किती वर्षांपासून चालवता?

५)   तुम्हाला रिक्षा चालवताना आलेला अनुभव सांगा .



एस.टी. चालक प्रश्नावली

१)     तुम्ही एस.टी.  चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतलेत? 

२)     एस.टी.  चावण्यासाठी कोण कोणत्या परीक्षा पास कराव्या लागतात?

३)     एस.टी.  चावण्यासाठी कोणत्या इंधनाची आवश्यकता असते?

४)     तुम्ही एस.टी.  किती वर्षांपासून चालवता?

५)     एस.टी. मधून एकाचवेळी किती प्रवासी प्रवास करतात?





(अ)        वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा.

उत्तर: झुक झुक झुक झुक अगीनगाडी

धुरांच्या रेघा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया…

मामाचा गाव मोठा

सोन्याचांदीच्या पेठा

शोभा पाहुन येऊया

मामाच्या गावाला जाऊया…



(आ)     महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रांत नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या  क्षेत्रांची यादी करा.
उत्तर: वैमानिक , अंतराळवीर, मेट्रो पायलट, ट्रेन पायलट, बस ड्राईव्हर, इंजिनिअर, वैज्ञानिक.

 

·                   पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा.



वाक्य

कर्ता

कर्म

क्रियापद

१. तेजवंत फुटबॉल खेळतो.

तेजवंत

फुटबॉल

खेळतो

२. शिक्षक कविता गातात.

शिक्षक

कविता

गातात

३. निशा निबंध लिहिते.

निशा

निबंध

लिहिते.

४. जोसेफ रस्त्यात पडला.

जोसेफ

-

पडला

५. दादा घरी आला.

दादा

-

आला

६. सुरेश उद्यापुण्याला जाईल.

सुरेश

-

जाईल

Post a Comment

0 Comments