15.बालसभा

 

प्र . १ .

अ ) महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन केले होते .


आ) बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता , तन्वी ,निलोफर ,कुणाल ,चंदर यांनी सहभाग घेतला होता .


इ) बालसभेचे नियोजन करताना सहावीच्या वर्गशिक्षिका , शाळेचे रखवालदार , सेविका मावशी , मीनल , जॉन ,प्रकाश , कुमुद ,संपदा , प्रफुल्ल ,चिनप्पा यांनी मदत केली .


प्र.२

महात्मा फुले -

महात्मा फुले यांच्या कवितेतल्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.


“ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।


बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली. जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.


डॉ . बाबासाहेब आंबेडकर -

डॉक्टरेट मिळवल्यावर भारतात परतून बाबासाहेबांनी जातिभेदाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. समाजकार्य करत अर्थार्जनासाठी त्यांनी वकिली करण्याचे ठरवले. समाजातील अस्पृश्यता आणि जातिभेद कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय स्वरूपात काम करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी पहिली केस नाशिक जिल्ह्यातील महार जातीच्या जाधव बंधूंची स्वीकारली. ही केस त्यांनी यशस्वीपणे जिंकली. वकिलीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते यासाठी त्यानी वकिलीसोबत कायद्याच्या प्राध्यापकाची नोकरीदेखील केली. अस्पृश्यतेचा विरोध करण्यासाठी साऊथबरो कमिटीसमोर त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आणि दलित आणि इतर मागासलेल्या समाजासाठी स्वतंत्र मतदान विभाग आणि आरक्षणाची मागणी केली. जनजागृती करण्यासाठी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शाहू महाराजांनीही यासाठी बाबासाहेबांना नेहमीच सहकार्य केले होते. त्यावेळी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. यासाठीच बाबासाहेबांना महाडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. सामाजिक आणि राजकीय लोकांना समाजात समान स्थान देणे हे या सभेचे ध्येय होते. अपृश्यता निवारण्यासाठी त्यांनी केलेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचेही उदाहरण लक्ष्यवेधी होते. काळाराम सत्याग्रह म्हणजे दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाला केलेले एक आवाहन होते. सामाजिक बदलाची प्रक्रिया हळू हळू होत असते हे माहीत असल्यामुळे बाबासाहेब आयुष्यभर अशा निरनिराळ्या मार्गांनी शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला.


प्र.३ .

आमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजन शाळा स्तरावर करायचे असेल तर आम्ही खालील प्रमाणे तयारी करू .

१) विज्ञान प्रदर्शनाची वेळ तारीख व सभागृह निश्चित करू .

२ ) विज्ञान प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करू .

३)विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करू .

४) सर्वांच्या सहकार्याने प्रदर्शन पार पाडू .


प्र.४ .

स्वातंत्र्यदिन , प्रजासत्ताकदिन , महाराष्ट्रदिन ,शिक्षकदिन , पर्यावरणदिन , आरोग्यदिन ,जागतिक महिलादिन , बालिकादिन इत्यादी .


प्र . ५ .

बालसभा खालील विषयांवर घेतल्या जातात .

शाळेच्या परिसराची स्वच्छता , शाळेची शिस्त ,कला - क्रीडा गुण संशोधन ,स्नेहसंमेलन इ .


प्र . ६

घोषवाक्य -

प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा .

झाडे लावा झाडे जगवा

पाणी आडवा पाणी जिरवा


समस्या -

कचरा समस्या

जल प्रदूषण .

वायु प्रदूषण .

ध्वनी प्रदूषण


प्रमुख पाहुणे - .

गावातील ज्येष्ठ नागरिक .

माजी सैनिक

कवी /लेखक

पत्रकार

मुख्याध्यापक .

आमदार /खासदार इ .



अ)        तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे.त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडास्पर्धेचा ओघतक्ता तयार करा.


उत्तर: पाहुण्यांचे स्वागत – प्रास्ताविक – क्रीडास्पर्धांचे उद्घाटन – खेळांबाबत मार्गदर्श आणि सूचना – बक्षीस वितरण – पाहुण्यांचे मनोगत – आभार प्रदर्शन.


 



आपण समजून घेऊया.


·       पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा.


(खालील तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा करा.)


वाक्य


कर्ता


कर्म


क्रियापद


१. तारा क्रिकेट खेळते.


तारा


क्रिकेट


खेळते


२. यास्मीन पुस्तक वाचते.


यास्मीन


पुस्तक


वाचते.


३. पक्षी किलबिल करतात.


पक्षी


किलबिल


करतात.


४. राजू अभ्यास करतो.


राजू


अभ्यास


करतो.


५. शबाना स्वयंपाक करते.


 शबाना


स्वयंपाक


करते


६. जॉन व्यायाम करतो.


जॉन


व्यायाम


करतो


Post a Comment

0 Comments