12.मला मोठ्ठं व्हायचंय!


 स्वाध्याय


प्र. १. दोन-तीन वाक्यांत प्रश्नांची उत्तरे लिहा.




(अ)        मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे?

उत्तर: मुलाला अंघोळीला न जाता शोध लावायचे आहेत. मुलाला शास्त्रज्ञ बनायचे आहे




(आ)     वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली ?

उत्तर: घरात स्वतःची  लॅब बनवली , मायक्रोस्कोप, टेस्टट्यूब्ज, काचेची पात्रं. अनेक पुस्तके आणून ठेवली. टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत. शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात. इत्यादी तयारी मुलाने वैज्ञानिक शोध लावण्यासाठी केली आहे.




(इ)    शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते?

उत्तर: शास्त्रज्ञ झाल्यावर  ताई आणि आई आपल्या समारंभात बक्षीस-समारंभात मिरवतील , त्यांना माझा अभिमान वाटेल. असे मुलाला वाटते.




(ई)     आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते?

उत्तर: आई मुलाला कपड्यांच्या बोळ्यांतून  निळी पँट शोधायला सांगते. हा शोध आई मुलाला लावायला सांगते.


प्र. २. मनाने उत्तरे लिहा.




(अ)        कोणत्या गोष्टींसाठी आई तुमच्या सारखी मागे लागते?

उत्तर: सकाळी लवकर उठण्याची सवय मला व्हावी म्हणून ती एकसारखी सकाळी लवकर उठ म्हणून मागे लागते. मी जेव्हा टीव्ही बघायला मिळतो तेव्हा ती अभ्यास कर म्हणून माझ्या मागे लागते.




(आ)     तुम्हांला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा.

उत्तर: मला अंतराळात सोडले तर मी सर्वप्रथम अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते हे पाहीन. तसेच अवकाशातील ग्रह, तारे जवळून पाहीन.




(इ)      तुम्हांला कोणते शोध लावावे असे वाटते ?

उत्तर: आई जेवण करत असताना घरातील सिलेंडर अचानक संपतो आणि शेगडी बंद होते. मला ज्याप्रमाणे गाडीत किती हवा आहे दाखवणारी मशीन असते त्या प्रमाणे सिलेंडर मध्ये किती ग्यास शिल्लक राहिला आहे. हे दाखवणाऱ्या मशीन चा शोध लावावा वाटतो. त्यामुळे सिलेंडर कधी संपणार हे आधीच लक्षात येऊन दुसऱ्या सिलेंडर ची सोय करणे शक्य होईल.


प्र. ३. (अ) वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.




(अ)        आकाशाला गवसणी घालणे.

उत्तर: अर्थ: मोठे यश संपादन करणे.


वाक्य: इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिली येऊन राणीने आकाशाला गवसणी घातली.




(आ)     निश्चय दांडगा असणे.

उत्तर: अर्थ: ठाम निश्चय करणे:


वाक्य: पाहते उठून खूप अभ्यास करण्याचा  राजूने ठाम निश्चय केला.




(इ)            खडकातून पाणी काढणे.

उत्तर: अर्थ: अशक्य गोष्ट शक्य करणे.


वाक्य: खूप वर्ष चालू होत नसल्याने बंद असलेल्या गाडीला चालू करून सार्थक ने जणू खडकातून पाणी काढले.



(ई)            मनस्ताप सहन करणे.

उत्तर: अर्थ: मनाला होणारा त्रास सहन करणे.

वाक्य: दहावीच्या परीक्षेत केदार नापास झाल्याने आईला मनस्ताप सहन करावा लागला.


 


(आ) पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत. त्यांची माहिती मिळवा व लिहा.




(अ) गुरुत्वाकर्षण : कोणतीही वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होणे.


(आ) टेस्टट्यूब्ज : काचेच्या परीक्षानळ्या


(इ) लॅब : प्रयोगशाळा . ज्या ठिकाणी विविध प्रयोग करून शोध लावले जातात.


(ई) विद्युतशक्ती : विजेची शक्ती.


(उ) अणू: पदार्थाचा सुक्ष्म कण


(ऊ) परमाणू : अणूचा एक सूक्ष्म कण ( अनेक परमाणू मिळून एक अणू तयार होतो.)


(ई)            प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते, त्याची यादी करा.


उत्तर: प्रयोग शाळेमध्ये असणारे साहित्य


१)   स्पिरीट चा दिवा २) चंचूपात्र ३) थर्मामीटर ४) विविध प्रकारची रसायने ५) सूक्ष्मदर्शिका ६) लिटमस पेपर ७) परीक्षा नळ्या ८) वजन काटा ९) चुंबक १०) चिमटा ११) जाळी


 




ई) तुम्ही आतापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले आहेत, त्यांपैकी खाली काही नमुने दिले आहेत त्यांमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील तक्त्यात लिहा.


नाट्यछटा


संवाद


नाट्यप्रवेश


आत्मवृत्


कथा


एक


दोन


अनेक


एक


अनेक


 


आपण समजून घेऊया.




·       शब्दांच्या शेवटी ‘इकार’ किंवा ‘उकार’ येतील असे दहा शब्द लिहा.


उत्तर: इकार : शाई, आई, खारी, माई, वही.


उकार: भाऊ,  माऊ, वाजवू, भेटू, खेळू.




·       खालील वाक्यांतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण घाला.


(इतका, जेवढा, तुमचा, तिचा, जसा, तेवढे)


१. बाबांनी विचारले,“ इतका वेळ कुठे होतास?”


२. तिचा चेहरा उन्हाने लालेलाल झाला.


३. मला वाटते,“ जेवढा कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त.”


४. तुमचा मुलगा खूप हुशार आहे.


५. जसा अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला.



·                   खालील नामांना दोन-दोन विशेषणे लिहा.


उदा., हिमालय-उंच, बर्फाच्छादित.


१. भाजी – ताजी  , चविष्ट


२. घर – सुंदर  , टुमदार


३. विद्यार्थी – हुशार  , प्रामाणिक


४. बाहुली – सुंदर  , गोंडस


५. लोक – अनेक  , प्रामाणिक

Post a Comment

0 Comments