11.माझ्या आज्यानं पंज्यानं

 

स्वाध्याय


प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.




(अ)        कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी व चऱ्हाटं वळल्यामुळे कोणती कामे करता आली?

उत्तर:     कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी व चऱ्हाटं वळल्यामुळे शेतातील पिकाची राखण करता आली, चव्हाटे वळल्यामुळे विहिरीतले पाणी काढण्यासाठी बांधलेली मोट चालवता आली त्यामुळे शेताला पाट भरून पाणी मिळाले इत्यादी कामे करता आली ?




(आ)     कवीच्या आजोबा-पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला?

उत्तर:     जेव्हा दिवसभर शेतामध्ये काम करून शेतकरी दमून जातो. त्याला विश्रांतीची गरजा असते. अशा वेळेला कवीच्या आजोबा-पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग शेतकऱ्याला आराम करण्यासाठी होतो.


प्र. २. शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा.

(अ)        येसणी –

उत्तर: बैल उधळू नये म्हणून बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी.


(आ)     गोफणी –

उत्तर: शेताचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी पाखरांना पळवून लावण्यासाठी विणलेली दोरी.




(इ)     चऱ्हाट –


उत्तर: मोटेला बांधण्यासाठी काथ्याचा वळलेला दोरखंड




(ई)   बाजा –


उत्तर: आराम करण्यासाठी विणलेली दोरीची चारपाई.




(उ)     काण्या –


उत्तर: गुरांना बांधण्यासाठी वळलेली दोरी.




(ऊ) दावणी –


उत्तर: गोठ्यात गुरांना बांधण्यासाठी असलेले साधन.



(अ)        शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्‍दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा.

उत्तर:


१)आज्यानं – पंज्यानं


२) येसणी – पेरणी


३) गोफणी – राखणी


४) चऱ्हाट – मोट


५) दावण्या – काण्या




(आ)     आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाणभाषेत लिहा.


उत्तर:


 (अ) इनल्या -  विणल्या


(आ) तवा – तेव्हा


(इ) वाह्याची – वहायची


ई) साळंला – शाळेला



(अ)        तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा-पणजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.

उत्तर: माझ्या आजोबा-पणजोबांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी

१)   वेसण २) गोफण ३) दावणी ४) चारपाई ५) नांगर ६) इरले.




(आ)     आंतरजालाच्या साहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या.


उत्तर: शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक साधने.




पॉवर टिलर


पॉवर टिलर या यंत्राचा वापर जमीन भुसभुशीत करण्यासाठी होतो. नांगरणी  करत असताना ढेकळे ही फोडली जातात त्यामुळे नांगरणी आणि ढेकळे फोडणी कामे एकाच वेळी होतात. ट्रॅक्‍टसारखी  ट्रॉली पॉवर टिलरला जोडून शेतमालाची वाहतूक करता येते.  पॉवर टिलर मशीन च्या  मागील बाजूला भात मळणी यंत्र जोडून भाताची मळणी करणे शक्य होते.




ऊस लागवड यंत्र


 शेताच्या मशागतीनंतरची ऊस लागवड करण्याचे काम या यंत्राच्या साह्याने केले जाते. या आधुनिक यंत्राच्या मदतीने पाच एकर इतक्या क्षेत्रामध्ये उस लावण्यासाठी फक्त आठ तास इतका वेळ लागतो.  या यंत्राच्या साह्याने लागवड करताना ट्रॅक्‍टर ड्रायव्हरशिवाय एकूण पाच मजुरांची आवश्‍यकता असते.


खेळूया शब्दांशी.


भाषेची गंमत पाहूया.


·        मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.


उदा., (१) चिमा काय कामाची


(२) भाऊ तळ्यात ऊभा


(३) काका, वाचवा, काका


(४) तो कवी डालडा विकतो


(५) हाच तो चहा


(६) तो कवी ठमाला माठ विकतो




·       तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पहा कशी गंमत येते.


उत्तर:


१)   रामाला भाला मारा


२)   भाऊ तळ्यात उभा


३)   शिवाजी लढेल जीवाशी


४)   टेप आणा आपटे

 


मनाने उत्तरे लिहा.


(अ)        ‘असलं त काय अति करा अम नसलं त काय माती करा?’ या म्हणीचा अर्थ काय असेल याचा विचार करा व लिहा.


उत्तर: जेव्हा तुमच्याकडे खूप असेल तेव्हा उधळपट्टी केली जाते आणि काही नसले तेव्हा गप्प राहा.




(आ)     कुकाचं डाबलं, अळकित्ता ही वऱ्हाडी बोलीतील वस्तूंची नावे आहेत. तुमच्या परिसरात या वस्तूंना कोणती नावे आहेत ते लिहा.


उत्तर: आमच्या परिसरात या वस्तूंना असलेली नावे


१)   कुकाचं डाबलं – कुंकवाचा करंडा


२)   अळकित्ता – अडकित्ता


 


·                   मनाने उत्तर लिहा.


तुमच्यावर तुमच्या लहान भावंडांना किंवा एखाद्या छोट्या बाळाला सांभाळण्याची वेळ आली आहे का? तुमचा अनुभव लिहा.


उत्तर:     हो माझ्यावर माझ्या लहान बहिणीला सांभाळायची वेळ आली होती. लहान मुलांना सांभाळणे म्हणजे खूप जबाबदारीचे काम. ती इतकी चपळ असतात की त्यांच्या मागे फिरून फिरून पार दमायला होते. त्यांना कधीच एकटे सोडता येत नाही कारण त्यांना एकटे सोडल्यावर ती काय करतील हे काही सांगता येत नाही. त्यांना कधी कोणती गोष्ट हवीशी होईल याचा काही नेम नसतो. आणि त्यांना हवी असलेली वस्तू जर त्यांना मिळाली नाही तर ती लगेच मोठ्याने रडायला सुरुवात करतात.

Post a Comment

0 Comments