5.तापमान

 




(अ) मी कोठे आहे ?



(१)     माझ्या परिसरातच ० ° से समताप रेषा आहे.


उत्तर:  मी शीत कटिबंधातील परिसरात आहे.




(२)   परिसरातील सरासरी वार्षिक तापमान २५ ° से . आहे .


उत्तर: मी उष्ण कटिबंधातील आहे.




(३) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान १० ° से .


उत्तर: मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे.


 


(ब) मी कोण ?




(१) समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते.


उत्तर: समताप रेषा


 


(२) तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो .


उत्तर: तापमापक


 


(३) जमीन व पाण्यामुळे मी तापते .


उत्तर: हवा


 


(१)   जमीन व पाणी माझ्यामुळे तापते .


उत्तर: सूर्य


 


(क) उत्तरे लिहा .


(१) पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा .


उत्तर:


1.           पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत असतात. परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वीपृष्ठभागावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागांत लंबरूप पडतात तर काही भागांत तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो.


2.           ०० ते १३०३०| या उतर व दक्षिण पट्ट्यांत सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते. प्रखर प्रकाश  व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो.


3.           १३०३० ते ६६०३०| या उत्तर व दक्षिण पत्त्यात तिरपे प्रकाशकिरण पडते. ते किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते. त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते. म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात.


4.           ६६०३०| ते ९०० उत्तर व दक्षिण पट्ट्यांत सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात. ते किरण अति जास्त जागा व्यापतात. अति जास्त जागा व्यापतात. अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते. त्यामुळे या पट्ट्यांना शीत पट्टे असे म्हणतात.


(२) अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा .


उत्तर:


1.  पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वीपृष्ठ भागावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे करीन काही भागांत लंबरूप पडतात तर खी भागांत तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो.


2.  ०० ते १३०३०| या उत्तर व दक्षिण पट्ट्यांत सृयाची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात म्हणून या पट्ट्यांत तापमान जास्त असते. प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो. त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो.


3.   १३० ते ६६०३०| या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते. ते किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते . त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते. म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात.


4.   ६६०३०| ते ९०० या उत्तर व दक्षिण पट्ट्यांत सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात. ते किरण अति जास्त जागा व्यापतात. आती जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते. त्यामुळे या पट्ट्यांना शीत पट्टे असे म्हणतात.


 


(३) समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्यांची कारणे कोणती आहेत ?


उत्तर:


समताप रेषांच्या आकारात भू पृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो.


1.   भूपृष्टावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. त्यामुळे सामाताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो.


2.जंगलतोड, नागरीकरण, औद्योगिकिकरण या घटकांमुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्टावर बदल होतो.

Post a Comment

0 Comments