4.हवा व हवामान

 



(अ) मी कोण ?




(१) मी नेहमी बदलत असते.


उत्तर: हवा


 


(२) मी सर्व ठिकाणी सारखे नसते .


उत्तर: हवामान


 


( ३ ) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते .


उत्तर: हिम




(१)            मी वातावरणात बाष्परूपात असते उत्तरे लिहा .


उत्तर: आर्द्रता


 


(ब) उत्तरे लिहा.


 


(१)   महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे ?

उत्तर:


महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच ठिकाणी म्हणजे अति उंचावर आहे.


समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसं तसे तापमान कमी कमी होत जाते म्हणून महाबळेश्वर चे हवामान थंड आहे.


 


(२)   समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय?


उत्तर:


१)   समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते त्या पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळते.


२)    हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी अधिक झाल्यावर हवा दमात होते. म्हणून समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते.


 


(३)   हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे?


उत्तर: 


हवा आणि हवामान यांतील फरक.


हवा


हवामान


एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात.


एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात.


हवा कशी आहे हे त्या, त्या वेळेनुसार सांगता येते.


हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात.


हवेत सतत बदल हो असतो व तो सहजपणे जाणवतो.


हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात.



(४)          हवेची अंगे कोणती?

उत्तर: तापमान, आर्द्रता, वारे, वायुदाब, वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत.


 


(५)         समुद्रसान्निध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो ?

उत्तर:


१)समुद्रसानिध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ होऊन हवेत मिसळते त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून तापमान दमट होते. याउलट समुद्रसानिध्य असणाऱ्या भागात बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास हवामान कोरडे होते.


२)समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. त्यामुळे हवामान थंड असते. यौलाद समुद्रसपाटीजवळच्या भागात भूपृष्ठ जवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते.




(क)         खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा.  (नकाशासंग्रह वापरा.)



उष्ण


भोपाळ


उष्ण व दमट


मुंबई


शीत


शिमला


उष्ण व कोरडे


नागपूर


शीत व  कोरडे


महाबळेश्वर


 


(ड) पुढील तक्ता पूर्ण करा.


हवा


हवामान


वातावरणाची अल्पकालीन स्थिती


हवेची दीर्घकालीन स्थिती


लवकर बदलते.


लवकर बदलत नाही.


विशिष्ट ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते.


सर्वच ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते.


हवेची अंगे- तापमान, वायुदाब वारे , आर्द्रता, वृष्टी.


हवामानाची अंगे- तापमान, वारे, वृष्टी, आर्द्रता, हवेचा दाब.


Post a Comment

0 Comments