6.महासागरांचे महत्व

 




अ ) . गटात न बसणारा घटक ओळखा . (नकाशा संग्रहाचा वापर करावा )


१ .शंख ,मासे ,खेकडा ,जहाज .


उत्तर - जहाज .


२ .अरबी समुद्र , भूमध्य समुद्र ,मृत समुद्र ,कॅस्पियन समुद्र .


उत्तर - मृत समुद्र .


३ . श्रीलंका ,भारत , नॉर्वे ,पेरू .


उत्तर - पेरू


४ . दक्षिण महासागर ,हिंदी महासागर ,पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर .


उत्तर - बंगालचा उपसागर .


५ . नैसर्गिक वायू , मीठ, लोह , मॅंगनीज .


उत्तर - नैसर्गिक वायू


ब ) प्रश्नांची उत्तरे लिहा .


१ . महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो ?


उत्तर -महासागरातून मानवाला मिठ, मासे ,शंख ,शिंपले तसेच लोह , शीसे , कोबाल्ट सोडियम , मॅंगनीज ,क्रोमियम , झिंक पदार्थ मिळतात .खनिज तेल , नैसर्गिक वायू देखील महासागरातून मिळतात .मोती ,पोवळे यासारख्या मौल्यवान वस्तू ,शंख शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू तसेच औषधी वनस्पतीदेखील महासागरातून मिळतात .


२ . जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते ?


उत्तर - जल वाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरुन केल्याने जहाजाचा वेग नैसर्गिक रित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते .तसेच मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक करता येते ,म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते .


३ . समुद्रसानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का ?


उत्तर - समुद्रसानिध्य असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते त्या प्रदेशातील दिवसभराच्या तापमानात विशेष फरक पडत नाही म्हणून येथील हवामान सम असते .खंडांतर्गत प्रदेशात बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यामुळे या प्रदेशातील तापमानात खूप फरक पडतो त्यामुळे येथील हवामान विषम असते .


४. पॅसिफिक महासागराचा किनारा कोण कोणत्या खंडालगत आहे ?


उत्तर - पॅसिफिक महासागराचा किनारा दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडालगत आहे .




Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال