3.भरती ओहोटी




3.भरती ओहोटी

प्रश्न १. जोड्या लावून साखळी बनवा.
 

‘अ’गट

‘ब’गट (उत्तरे)

‘क’गट (उत्तरे)

लाटा

वारा

कंप व ज्यालामुखीमुळेही निर्माण होतात.

केंद्रोत्सारी प्रेरणा

पृथ्वीचे परिवलन

वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.

गुरुत्वीय बल

चंद्र, सूर्य व पृथ्वी

भू पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करतो.

उधाणाची भरती

अमावस्या

सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते.

भांगाची भरती

अष्टमी

चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात.

प्रश्न २.भौगोलिक कारणे सांगा.

(१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
उत्तर:

१)चंद्र हा सूर्याच्या अधिक जवळ आहे.

२)सूर्यापेक्षा पृथ्वीच्या अधिक जवळ चंद्र असल्याने चंद्राचे गुरुत्वाकर्षण बळ हे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बळापेक्षा पृथ्वीवर अधिक परिणाम करते.

(२) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
उत्तर:

१)काही ठिकाणी किनाऱ्यावरील सखल भागामध्ये समुद्राच्या भरतीमुळे पाणी येते.

२) पाण्याबरोबर गाळ आणि पाणी वाहून येऊन सखल भागात त्याचे संचय होते.

३) अशा भागांत तिवारीची वने मोठ्या प्रमाणात वाढतात.

त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.



(३) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
उत्तर:

1) रेखावृत्तावरील जेव्हा विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी असणारा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा त्या ठिकाणी असणार्या केद्रोत्सारी बलाच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे त्या ठिकाणाचे पाणी हे चंद्राच्या दिशेने खेचले जाते.

2) भरतीमुळे रेखावृताशी काटकोनात असणार्या समोरासमोरील दोन रेखावृतांवरील पाण्याची पातळी ओसरत असते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते.

अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच असते.

प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.


(१) जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या, ते लिहा.
उत्तर: जर सकाळी ७ .०० वाजता भरती आली असेल तर त्या पुढील भरती ही दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी येईल तर त्यापुढील भरती ही सायंकाळी साधारणपणे ७ वाजून २४ मिनिटे इतकी असेल.



(२) ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा.
उत्तर: ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या पश्चिम १०७० रेखावृत्तावर भरती असेल.

कारण :

१) पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते.

२) ७३° पूर्व रेखावृत्ता विरुद्ध बाजूला पश्चिम १०७० रेखावृत्त आहे.

 
(३) लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा.
उत्तर:

१)वारा हे लाटा निर्मितीचे मुख्य कारण आहे.

२)काही वेळेला सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखींमुळे देखील लाटांची निर्मिती होते.



प्रश्न ४.पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा
(१) पोहणे    
 उत्तर: पोहताना आपल्याला भरती-ओहोटीच्या वेळा माहित असणे गरजेचे आहे. या वेळा माहित करून मगच समुद्रात आत जाणून पोहणे योग्य ठरते.



 (२) जहाज चालविणे
उत्तर: भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात तसेच समुद्रकिनाऱ्यावरून खोल समुद्रात घेऊन जाता येतात.



(३) मासेमारी
उत्तर: भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.



(४) मीठ निर्मिती
उत्तर: भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार करता येते.



(५) सागरी किनारी सहलीला जाणे.
उत्तर: भरती-ओहोटीचा अंदाज नित न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.

प्रश्न५. भांगाची भरती-ओहोटी या आकृती ३.८ चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१)आकृती कोणत्या तिथीची आहे?
उत्तर: ही आकृती अष्टमी या स्थितीची आहे.



(२) चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे?
उत्तर: चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोन याप्रमाणे आहे.



(३) या स्थितीचा भरती-ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल?
उत्तर: या स्थितीमध्ये सरासरीपेक्षा लहान भरती व सरासरीपेक्षा लहान ओहोटी निर्माण होईल.

 

प्रश्न६. फरक स्पष्ट करा.
(१) भरती व ओहोटी
उत्तर:

भरती

ओहोटी

१)सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ, म्हणजे भरती होय.

 

१) सागरजलाच्या पातळीत होणारी घट, म्हणजे ‘ ओहोटी होय.

२)भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते.

२)ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते.

(२) लाट व त्सुनामी लाट
उत्तर:

लाट

त्सुनामी लाट

1)वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात.

१)सागरतळाशी झालेल्या भूकंप आणि ज्वालामुखींमुळे स्तुनामी लाट निर्माण होते.

२)लाट विनाशकारी नसते.

२)स्तुनामी लाट विनाशकारी असते.

प्रश्न ७.भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.
उत्तर:

· भरती-ओहोटीचे चांगले परिणाम

भरतीभरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.

 बंदरे गाळाने भरत नाहीत.

भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.

भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.

भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.

भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.

भरती-ओहोटीमुळे तिवराची वने, किनारी भागांतील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.

· भरती-ओहोटीचे वाईट परिणाम


भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. 

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال