3.भारतापुढील अंतर्गत आव्हाने


प्रश्न १ला : थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) ‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या ?

उत्तर :- ‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने खालील मागण्या केल्या.

१. चंदीगढ पंजाबला द्यावे.

२. इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत.

३. सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे.

४. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.



(२) जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे? 

उत्तर :- सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे गरजेचे आहे. त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. परस्परांच्या सण-उत्सवात सहभागी झाले पाहिजे. एकमेकांच्या चांगल्या चालीरिती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता __ आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. धार्मिक सलोखा का बिघडतो? त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे.

(३) प्रदेशवाद केव्हा बळावतो ? 

उत्तर :- आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो. मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना निर्माण होण्यातून, माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून प्रांताभिमान निर्माण होतो. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला

प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते, तेव्हा प्रदेशवाद बळावतो. विकासातील असमतोलातून प्रदेशवाद वाढीस लागतो. प्रादेशिक अस्मिता, स्थानिक परंपरा, संस्कृती यांच्या अनाठायी गैरवापरातूनही प्रदेशवाद

बळावतो.



प्रश्न २ रा : पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

(१) जमातवाद :-

 उत्तर :- ‘जमातवाद’ म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय. जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुरभिमानात रूपांतर होते. समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात, त्यातूनच जमातवाद निर्माण होतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.

(२) प्रदेशवाद :-

 उत्तर :- ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे, आपल्या प्रदेशाला श्रेष्ठ समजणे आणि अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठतेची भावना निर्माण होणे होय. अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते. त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो.

प्रश्न ३ रा : का ते लिहा .

(१) ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले.

उत्तर :- १९८० मध्ये पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ या चळवळीने मूळ धरले. या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरणसिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते. सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले. यातूनच १९८३ मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरुप आले. त्यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली.सुवर्णमंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठीच ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले.

(२) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. 

उत्तर :- संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. या दुरभिमानातून भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरील विश्वास उडतो. हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो. समाजातील शांतता धोक्यात येते. धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवीत यांची हानी होते. व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडून फुटीरता वाढीस लागते. या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रुराष्ट्रे घेतात ; म्हणून जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.
४. पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा.

(3) MNE (Long Form)
Mizo National Front
मिझो नॅशनल फ्रंट
(२) NNC (Long Form)
Naga National Council
नागा नॅशनल कौन्सिल
(3) PLGA (Long Fprm)
People’s Liberation Guerrilla Army
पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी



Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال