(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख …….. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(अ) १२
(ब) १४
(क) १६
(ड) १८
उत्तर :- १४
(२) वीस कलमी कार्यक्रमाची .यांनी घोषणा केली………..
(अ) पं. नेहरू
(ब) लालबहादूर शास्त्री
(क) इंदिरा गांधी
(ड) पी.व्ही.नरसिंहराव
उत्तर :- इंदिरा गांधी
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
(१) कावसजी दावर – पोलादाचा कारखाना
(२) डॉ.दत्ता सामंत – गिरणी कामगारांचे नेतृत्व
(३) ना.मे.लोखंडे – गिरणी कामगारांना सुट्टी
(४) नारायण सुर्वे – कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन
उत्तर :- चुकीची जोडी : कावसजी दावर
( योग्य जोडी पोलादाचा कारखाना योग्य जोडी : कावसजी दावर – पहिली कापड गिरणी)
२. तक्ता पूर्ण करा.
पंचवार्षिक योजना कालावधी उद्दिष्टे
पहिली १९५१-१९५६ शेती, सामाजिक विकास
दुसरी १९५६-१९६१ उद्योगिकीकरण
तिसरी १९६१-१९६६ विषमतेचे निर्मूलन, रोजगारसंधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
चौथी १९६९-१९७४ शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन
पाचवी १९७४-१९७९ दारिद्र्यनिर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
(ब) : संकल्पना स्पष्ट करा.
(१) मिश्र अर्थव्यवस्था :
उत्तर :- ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही सरकारी मालकीचे असतात; अशा अर्थव्यवस्थेस ‘मिश्र अर्थव्यवस्था’ असे म्हणतात. भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो.
(२) वीस कलमी कार्यक्रम :
उत्तर :- १ जुलै १९७५ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. त्यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे. (१) शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे. (२) कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. (३) करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. (४) जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. (५) हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
३. (अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
उत्तर :- प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण होते. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती मिश्र अर्थव्यवस्थेत दिसून येते.मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिला जातो.या अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत म्हणून तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो, त्यामुळे सरकारला आणि खासगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येतात. या सर्व कारणांमुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
(२) १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
उत्तर :- भारताने स्वतंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली
होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे होते. राष्ट्रीयीकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकासधोरण राबवणे आवश्यक होते. या सर्व कारणांमुळे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी १९ जलै १९६९ रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
(३) गिरणी कामगार संपावर गेले.
उत्तर :- काही उद्योगांत कामगारांचे पगार वाढत होते. त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. त्यामुळे गिरणी कामगारांत असंतोष वाढत होता. १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून, कामगार वर्गाला विश्वासात न घेता ८ ते १७ % वर तडजोड केली. बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉ. दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. ६५ गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. १८ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत अडीच लाख गिरणी कामगार संपावर गेले.
(ब) : पुढील प्रश्नाची २५-३० शब्दात उत्तरे लिहा.
(१) आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरु करण्यात आले ?
उत्तर :-
१) प्रधानमंत्री रोजगार योजना
२)महिला समृद्धी योजना .
३)राष्टीय सामाजिक,आर्थिक सहाय्य योजना.
४) मधान्य आहार योजना.
५) इंदिरा महिला योजना
६) गंगा कल्याण योजना.
(२) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले ? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील प्रकल्प सुरू करण्यात आले.
उत्तर :-
१) दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने.
(२) सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना.
३) चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना.
४) पेरांबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना,
५) विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना.
६) भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे.