(अ) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध का होते ?
शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाईक्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली ; हे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ यांना माहीत होते. त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते.
(आ) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती ?
धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात अडचण आली. तशात शत्रूची विमाने माथ्यावर घोंघावू लागली. गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या.
(इ) निर्मलजीत सेखाँनी निकराची लढाई चालू का ठेवली ?
निर्मलजीत सेखाँचे नॅट विमान वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर विमानांचा जोशाने प्रतिकार सुरू केला. शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढले होते ; म्हणून निर्मलजीत सेखाँनी निकराची लढाई चालू ठेवली.
(ई) निर्मलजीत सेखाँनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला ?
निर्मलजीत सेखाँना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेढले होते. त्यांनी निकराची लढाई केली. शत्रूच्या दोन विमानांचा अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत सेखाँनी त्यांच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले. अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव केला.
(उ) दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला ?
एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेल्यामुळे माणसे पाण्यावाचून तडफडू लागली. त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता. दधीचींच्या हाडांमध्ये अमोल शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते. लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अस्थींपासून इंद्रवज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला. अशी एक पुराणकथा आहे.
प्र. २. फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ हे शत्रूशी धैर्याने लढले. त्याचे पाच-सहा वाक्यांत वर्णन करा.
श्रीनगर हवाईक्षेत्रामध्ये शत्रूची सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली. धावपट्टीवरच्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करता आले नाही. शत्रूची विमाने गोळ्यांच्या फैरी झाडत असतानाच प्राणांची पर्वा न करता सेखाँनी आपले नॅट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला. शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही सेखाँनी निकराची लढाई सुरू ठेवली. त्यांच्या धाडसी हल्ल्यामुळे शत्रू पळून गेले; पण या भीषण युद्धात निर्मलजीत सेखाँ यांनी आपले प्राण गमावले.
प्र. ३. परमवीरचक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते ?
परमवीरचक्रधारकांची माहिती वाचून आपले बाहू स्फुरण पावतात. त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांनी जी निरपेक्ष देशसेवा केली व प्राणांचे बलिदान दिले, त्याप्रमाणे आपणही देशासाठी त्याग करावा व देशाची शान वाढेल अशी देशसेवा करावी, अशी प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
प्र. ४. आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हांला कोणते साम्य आढळते ?
आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात आणि प्रसंगी स्वतःचा जीवही देतात. दधीची ऋषी यांनीही लोककल्याणासाठी स्वतःच्या हाडांचे शस्त्र व्हावे, म्हणून प्राणांची आहुती दिली. लोककल्याणासाठी प्राणांचे बलिदान करणे, हेच साम्य दोघांमध्ये आढळते.
परमवीर चक्र कांस्य धातूचे बनवलेले असते. छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळी कापडी पट्टी असते. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते. पदकाच्या मागच्या बाजूला 'परमवीर चक्र' हे शब्द इंग्रजी व हिंदी भाषेत गोलाकार कोरलेले असतात. त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे असतात.
'परमवीर चक्र' पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मुळच्या युरोपच्या राहणाऱ्या होत्या. भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्या भारतात आल्या. भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारताचे नागरिकत्व पत्करले. त्यांनी भारतातील कला, परंपरेचा अभ्यास केला. मराठी, संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असत.
(अ) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
(अ) घोंगावणे.
गलिच्छ वस्तीत सर्वत्र माशा घोंगावत होत्या.
(आ) झेपावणे.
काही क्षणातच विदेशी पाहुण्यांचे विमान आकाशात झेपावले.
(अ) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
(इ) वेध घेणे.
धनुर्धारी अर्जुनाने पक्ष्याच्या डोळ्याचा अचूकपणे वेध घेतला.
(ई) वेढणे.
क्षणात लागलेल्या आगीने शेताला चोहीकडून वेढले.
(अ) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
(उ) बचावणे.
विहिरीत पडलेला मुलगा कसाबसा बचावला.
(ऊ) सामोरे जाणे
संकटांना न भिता सामोरे जाणे हेच चांगले.
(अ) सावध =जागृत / दक्ष / सजग
(आ) लढाई= युद्ध
(इ) प्रत्यक्ष = समोर
(ई) शत्रू=वैरी / दुश्मन
0 Comments