5.स्वराज्यस्थापना

 


5.स्वराज्यस्थापना


*स्वाधाय*

१) गटात न बसणारा शब्द शोधा.

1. पुणे, सुपे, चाकण, बंगळूर. 

- बंगळूर.

2.फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत.

-फलटणचे जाधव.

3.तोरणा, मुरुंबदेव सिंहगड, सिंधुदुर्ग, 

-सिंधुदुर्ग.

चला लिहिते होऊया

1.शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा.

वीरमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांवर पुढील विविश्व संस्कार केले:- प्रशील म्हणजेच शुद्ध चारित्र्य ) सत्यप्रियता 3) वाक्चातुर्य ४) दक्षता प्रधैर्य )निर्भयता 4) शस्त्रप्रयोग (८) विजयाकांक्षा ९) स्वराज्याचे स्वप्न,

2.शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजीमहाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

3.शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.

शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी:- येसाज़ी
कंक, बाजी पासलकर, बापूजी मुद्गल, नन्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे,


शोधा आणि लिहा.

1.शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात ? 

परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी शिवरायांना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. म्हणूनच शहाजीराजांना 'स्वराज्य संकल्पक' असे म्हणतात.

2. शिवरायांनी आरमार उभाणीकडे लक्ष का दिले? 

सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे, याची शिवरायांना जाणीव झाली; म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.

3. शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला? 

एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलाशी या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही, हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला,

4.शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले ? 

शिवा काशिद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून  पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यां बरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून . विशाळगडाकडे गेले.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال