2.बंडूची इजार

 



प्र.१. चर्चा करून उत्तरे लिहा.


अ) बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा.

उत्तर: 
बंडूची इजार आखूड झाली असती तर त्या इजारीला लांब करण्यासाठी इजार शिवताना ठेवलेली जास्तीची शिलाई सोडवून इजार मोठी करता आली असती. किंवा इजारीला त्याच रंगाचे दुसरे कापड जोडून इजार लांब करता आली असती.

आ) इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची?

उत्तर:
 इजारीची चड्डी झाली यात चूक घरातील सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला हवे होते.

इ) बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले, म्हणजे ‘पाय’
असणारी इजार सजीव आहे, असे आपण म्हणत नाही; पण बोलताना आपण असेच बोलतो. एजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा.

उत्तर: शर्टाचे हात, कपाचा कान, बाटलीचे तोंड, पेनाची जीभ, इत्यादी .

प्र. २) खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा.

(कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड) 

अ) चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती.

आ) कपाचा कान तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.

इ) 'हा नारळ नासका निघणार,' नारळाचा डोळा बगून धनव्या म्हणाली.


ई) मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. 

उ) कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना.

ऊ) चरवितले दुध गंजात ओतले, तर ते गंजाच्या गळा पर्यंत आले.

ए) सुईच्या नाका दोरा ओऊन धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरु केली.

ऐ) आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गानू कोय चोखत राहिला.

ओ) आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वादाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.

औ) खोलीत्याल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال