5. मुलभूत हक्क भाग-2

 



प्रश्न 1. लिहिते व्हा.

1) धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.

उत्तर :

i) भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत.

ii) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली नाही.

iii) ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत. थोडक्यात, धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.


2) संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय ?

उत्तर :

हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात.


प्रश्न 2. योग्य शब्द लिहा.

1) बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण

उत्तर :

देहोपस्थिती / बंदी प्रत्यक्षीकरण


2) कोणत्या अधिकाराने ही कृती केली, असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश

उत्तर :

अधिकारपृच्छा


(3) लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाला आदेश

उत्तर :

परमादेश


4) कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश-

उत्तर :

मनाई हुकूम / प्रतिषेध


प्रश्न 3. आपण हे करू शकतो, याचे कारण पुढे नमूद करा.


1) सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. कारण

उत्तर :

कारण 1) सण, उत्सव आहार आणि जीवनपद्धती याबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे.

ii) त्यामुळे आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिल आहे. म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात.


2) मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. कारण ...........

उत्तर :

कारण - i) आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे

(ii) त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन कर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात. म्हणून मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते.


4. रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे !

1) हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार...विचारात घेते.

उत्तर :

हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते.


2) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये ........ शिक्षण सक्तीचे करता येत नाही.

उत्तर :

शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही.


Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال