4.सावरपाडा एक्स्प्रेस

 

.

4.सावरपाडा एक्स्प्रेस



प्र.१.एका वाक्यात उत्तरे लिहा.


अ) कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला?
उत्तर: कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला.

आ) कविताला कशामुळे दिलासा मिळाला? 

उत्तर: चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक हुकले; त्या प्रसंगी आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.

इ) कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? 

उत्तर: कविताचे पाय कष्टप्रद अनुभवांमुळे कणखर बनले.

इ) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले?


उत्तर: कविताने जेव्हा नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा विजेंद्र सिंग यांनी कविताचे वेगळेपण ओळखले.

ई) कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही?

उत्तर:आईला उगीच वाईट वाटू नये म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही.

उ) कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? 

उत्तर: कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते.

ए) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते?

उत्तर: कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्वाच्या असतात.

प्र. २. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) कविता राऊतला' सावरपाडा एक्स्प्रेस ' का म्हणतात?

उत्तर: कविताने राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य पदके कविताने पटकावली. लागोपाठ च्या या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने भारताचे नाव उंच केले म्हणून तिला सावरपाडा एक्स्प्रेस असे म्हणतात.

आ) कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली ? 

उत्तर: नाशिक येथे सराव आणि हरसूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची होणारी ओढाताण पाहून. विजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा प्रश्न तिच्या आईवडिलांना पडला. त्यामुळे ओढाताण कमी व्हावी म्हणून शिक्षण व सराव यासाठी कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली.


इ) हरसूल, सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो?

उत्तर:एका पाठोपाठ एक विक्रम कविताच्या नावावर झळकू लागले. कविताच्या या यशामुळे हरसूल,सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. म्हणून संपूर्ण हरसूल, सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो.

ई) आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईना का वाटते ?

उत्तर: नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकली. स्पर्धेत विजय मिलाल्यानंतर ती आपल्या गावी येणार, म्हणून सकाळपासून सार्वजन स्वागताच्या तयारीत गुंतले होते. तिचे कौतुक करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लॉक उपस्थित राहिले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या अलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सर्व पाहिल्यावर आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईना वाटते.


ई) कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात?

उत्तर: आपली मुलगी इतकी पुढे जाईल असं तिच्या आईवडिलांना कधीच वाटल नव्हत. कविताच्या प्रतिकूल परिस्थितीत प्रशिक्षक विजेंद्र सिंग हे कविताला मदत मिळावी म्हणून कमीपणा वाटून न घेता जो भेटल त्या प्रत्येकास विनंती कार्याचे. जर त्यांनी कमीपणा वाटून घेतला असता तर कविता आज इथपर्यंत पोहचू शकली नसती म्हणून कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात.

ऊ) कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल?

उत्तर: आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेणे, प्रामाणिकपणे यशासाठी मेहनत घेणे, अपयश 

आले तरीही खचून न जाता यशासाठी प्रयत्न करत राहणे ही प्रेरणा मी कविताकडून घेईन.

प्र.३. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.

उदा.

अ) पण - वेगळेपण, मोठेपण

आ) दार – चमकदार, रुबाबदार

इ) पणा - कमीपणा, खोटेपणा

उ) इक - आर्थिक, औद्योगिक

ई) पणी - लहानपणी, मोठेपणी

ऊ) इत - अखंडित, सदोदित


प्र.४. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

अ) दिलासा मिळणे.

उत्तर: परीक्षेतील अपयशामुळे खचलेल्या राजूची आईने समजूत काढल्यावर राजूला दिलासा मिळाला.

आ) गराडा घालणे.

उत्तर: गावात जादुगार येताच त्याच्याभोवती लहान मुलांनी गराडा घातला

इ) कणखर बनणे.

उत्तर: कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले.


ई) ओढाताण होणे.

उत्तर: घरातील कामे व शेतातील कामे यांमुळे आईची फार ओढाताण होते.

उ) नात्यातील वीण गहिरी असणे.

उत्तर: माझी व माझ्या भावाच्या नात्यातील वीण गहिरी आहे.

ऊ) वणवण सहन करणे.

उत्तर: चार पैसे कमावण्यासाठी संतोष ला वणवण सहन करावी लागते.

प्र. ५. समान अर्थाचे शब्द लिहा.


(अ) माय - आई, जननी.
(आ) लेक - मुलगी.
(इ) बळ - सामर्थ्य, शक्ती.
(ई) गहिरे - खोल.
(3) क्रीडा - खेळ.
(ऊ) वडील- बाप.

प्र.६. तुम्हांला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो?

उत्तर- या प्रश्नाचे उत्तर स्वतः लिहावे.


प्र. ७. तुम्हांला मैदानी खेळ आवजात, की बैठे खेळ? की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा.

 उत्तर- या प्रश्नाचे उत्तर स्वतः लिहावे.

प्र. ८. खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दांत सांगा.

(अ) तुमची गल्ली / गाव कशाने वेढलेले आहे?
(आ) आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत.
(इ) अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत.
(ई) कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या
असतात.

उत्तर- या प्रश्नाचे उत्तर स्वतः लिहावे.


प्र.१०. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ' क्रीडामहोत्सव ' या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा.

 महोत्सवाचा दिवस , महिना, काळ, स्थळ, तालुका / जिल्हा / राज्य पातळी , खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. 

उत्तर- या प्रश्नाचे उत्तर स्वत: लिहावे.

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال