प्रश्न. १ ला. खालील चौकटी पूर्ण करा.
अ) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ.
उत्तर – आकलनशक्ती वाढवणे.
आ) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत.
उत्तर – कवितेत संभाषण केले.
इ) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण.
उत्तर – कविता करण्याची आवड निर्माण व्हावी.
ई) कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण.
उत्तर – सुधीरची काव्यप्रतिभा वाढली.
प्रश्न. २ रा. पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर – कविता करताना शब्दरचना, यमक, मांडणी या गोष्टींना खूप महत्त्व असते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं, म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं होय.
प्रश्न. ३ रा. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.
उत्तर – या प्रश्नाचे उत्तर विध्यार्थानी स्वतः लिहायचे आहे.
प्र. ४. ‘आम्ही चित्र काढतो’ या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून
सादर करा.
उत्तर :
अनु : तू खूप छान चित्र काढलेस.
सोना : तू पण चॅन चित्र काढलास.
किरण : तुम्ही दोघीनी एकदम छान चित्र काढलात.
सोना : हो का किरण तू तर आमच्या पेक्षा सुंदर चित्र काढलास.
अनु : होय किरण खूपच मस्त आहे हे.
किरण : धन्यवाद.
प्रश्न. ५ वा. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.
उत्तर – शांताबाईंची बाग अन् सुर्वेची गिरणी, गदिमांचे घर अन् बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. हा काव्यसंवाद मला खूप आवडला. कारण या काव्यामध्ये सुधीरच्या मनःस्थितीचे वर्णन केले आपल्याला पाहायला मिळते.
प्रश्न. ६ वा. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर – पाठात आलेल्या साहित्यिकाची नाव
बालकवी
गदिमा
शांताबाई
चर्चा करूया.
• तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल ?
•तुम्ही ‘काव्यवाचनाचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
खेळूया शब्दांशी.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा.
(अ) खो देणे.
उत्तर – बंधनातून मुक्त होणे.
आ) पाश सोडणे.
उत्तर – नकार देणे.
इ) हेका धरणे.
उत्तर – हट्ट करणे.
ई) भावनांचे मोहोळ चेतवणे.
उत्तर – भावना जागृत करणे.
खेळ खेळूया.
अ) खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. (अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)
अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो.