13. अनाम वीरा…

 



प्रश्न १ ला. कवींनी असे का म्हणटले असावे, असे तुम्हाला वाटते ?

अ) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !

उत्तर – कुसुमाग्रज त्यांच्या ‘अनाम वीरा’ या कवितेत म्हणतात की, देशांच रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असे कितीतरी अनाम वीर आहेत. ते सर्व वीर अज्ञात आहेत. त्यामुळेच अजूनही त्यांच्या नावाने कोणी स्तंभ उभारला नाही किंवा त्यांची आरती ही गायिली नाही. कारण अजूनही त्याचे बलिदान हे अज्ञात होते.


आ) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

उत्तर- कुसुमाग्रज त्यांच्या ‘अनाम वीरा’ या कवितेत म्हणतात की, संसार सर्वांना प्रिय असतो. पण देशाचे रक्षण करायला आणि त्यासाठी प्राणांचे बलिदान द्यायला हे सैनिक संसाराचा त्याग करून रणांगणावर जातात.


इ) सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

उत्तर – आपल्या बलिदानाप्रीत्यर्थ कुणी स्तंभ उभारले नाहीत, कुणी पोवाडे गायले नाहीत, कुणी आरती गायली नाही, पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही. खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले आहे. असे ‘अनाम वीरा’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात.









प्रश्न ४ था. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
१) अनाम वीरा –

उत्तर – ज्याचे स्तंभ नाहीत, अज्ञात वीर, पोवाडे नाहीत असा

२) जीवनान्त:
उत्तर – जीवनाचा अंत, सैनिकाचा रणांगणावरील अंत

३) संध्येच्या रेषा:
उत्तर – संध्याकाळचे रंग

४) मृत्युंजय वीर :
उत्तर – मृत्यूवर विजय मिळवणारा वीर



Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال