प्रश्न. २ रा. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर – या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यु येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तुत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. अशी कर्तबगारी करून जा कि सगळ्यांना तुमची आठवण यावी.
प्रश्न. ३ रा. संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर – निडरपणे डोळ्याला डोळा भिडवून संकटांचा सामना करावा. समोर आलेल्या संकटांना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. संकटांना जशास तसे खंबीरपणे उत्तर द्यायला हवे.
प्रश्न. ४ था. ‘संकटांना न घाबरता तोंड दयावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखादया प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर – या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थांनी स्वतःच्या अनुभवावरून लिहायचे आहे.
प्रश्न. ५ वा. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर – नेहमी निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुखाने जगावे. मोठी कामगिरी करतानाही नेहमी वास्तवाचे भान ठेवावे. जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील अशी कामगिरी करावी. या कवितेतून काळावर आपला ठसा उमटवायला हवा असा संदेश कवींनी दिला आहे.
चर्चा करूया.
आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी –
स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते. स्वप्ने मोठी असतील तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर ते पूर्ण करण्यासाठीची जिद्द मोठी असेल. या सर्व गोष्टी ज्यांच्या जवळ आहेत त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही.
इच्छा असेल तर मार्ग मिळतो –
कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते फक्त गरज आहे ती इच्छेची. मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आपोआपच दिसतील. असेही म्हणतात इच्छा असेल तर माणूस वाळवंटातही शेती करू शकतो, वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजेच कितीही कठीण गोष्ट सहज शक्य करू शकेल गरज आहे ती फक्त इच्छेची.