प्र. १. खालील विधानांमागील कारणे लिहा.
(अ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
उत्तर: कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
(आ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ‘डांग्या’ ठेवले.
उत्तर: कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले.
(इ) लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.
उत्तर: डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.
प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ) थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये.
उत्तर:
१) हळवा
२) सर्वांगाला वेढून टाकणारा.
३) नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा.
४) रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा.
(इ) खालील बाबतींत डांग्याचे वर्णन करा.
दिसणे
शरीरयष्टी
चाल
नजर
उत्तर:
जस जसे डांग्याचे वय वाढत चालले होते तसे त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्यांखाली असणारे पिवळसर पत्ते व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पत्ते सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते.
डांग्याची शरीरयष्टी दणकट होती. त्याचे शरीर सगळ्यांच्याच नजरेला भुरळ घालणारे होते.
डांग्याची दुडूदुडू चाल सर्वांना भावणारी होती.
डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते.
(आ) कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली, हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये.
उत्तर:
१) अंगाच गाठोड करून पडलेलं.
२) सर्मोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली
३) हुडहुडी रोखण्याचा त्याचा चालेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला.
४) थंडीच्या ओलसरपणान त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडलय की काय असा भास झालेला.
५) इवल्याश्या जीवाला तशी थंडी असह्यच.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
(अ) मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.
अव्यय: नंतर
संबंध: परीक्षा
(आ) तुझ्यादेखील हे लक्षात कसे आले नाही?
अव्यय : देखील
संबंध : तुझ्या
(इ) रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.
अव्यय : वरील
संबंध : रस्ता
(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
अव्यय : देण्या
संबंध: कडे