प्र. १. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा.
(अ) गोमूचे माहेर-
उत्तर: कोंकण
(आ) कोकणची माणसं-
उत्तर: साधीभोळी
प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.
(अ) कोकणची वैशिष्ट्ये
उत्तर:
१) खाडीच्या किनाऱ्यावर हिरवीगर्द झाडी व उंच उंच माड आहेत.
२) कोकणातली मनसे शहाळ्यासारखी गोड व साधीभोळी आहेत.
३) भगव्या रंगाच्या आबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो.
४) कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे.
(आ) खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(अ) काळजात त्यांच्या भरली शहाळी
उत्तर: कोवळ्या नारळाला शहाळे म्हटले जाते. शहाळ्यातील पाणी हे मधुर खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची माने कोमल व स्वभाव गोड असतो.
(आ) झणी धरणीला गलबत टेकवा
उत्तर: गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल.
प्र. ४. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वर हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनंती कवी करत आहे.
खेळूया शब्दांशी.
(अ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
(१) नाखवा – दाखवा
(२) खाडी – झाडी
(३) भोळी – शहाळी
(४) साऱ्या – वाऱ्या
(आ) खालील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
(१) शीड
उत्तर: होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड
(२) माड
उत्तर: नारळाचे झाड
(३) खाडी
उत्तर: भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी
(४) शहाळी
उत्तर: कोवळा नारळ
(५) झणी
उत्तर:
(६) गलबत
उत्तर:
तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर: (विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गावात असणाऱ्या स्थळांचे वर्णन लिहावे)
आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
उत्तर: महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, प.बंगाल .
आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या,शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
उत्तर: रत्नागिरी, जयगड, विजयदुर्ग, देवगड, पारुळे, मुंबई, गणपतीपुळे, मुरुड.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
(अ) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
उत्तर: सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
(आ) आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.
उत्तर: आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.
(इ) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.
उत्तर: ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.