8 . उद्योग व व्यापार


प्रश्न १ ला : दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) १९४८ मध्ये …………… या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. 

(अ) औद्योगिक क्षेत्राचा आर्थिक विकास व्हावा.
(ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.
(क) रोजगार निर्मिती व्हावी.
(ड) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी.

उत्तर :- (ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

(२) भारतातील ………… उद्योगाला ‘सनराइज क्षेत्र’ म्हटले जाते.

(अ) ताग

((ब) वाहन)

(क) सिमेंट

(ड) खादी व ग्रामोद्योग

उत्तर :- (ब) वाहन)



(३) वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ………….. हे आहे.

(अ) कापड उत्पादन करणे. 

((ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.)

(क) कापड निर्यात करणे.

(ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

उत्तर :- (ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.)

(४) सायकल उत्पादनात हे भारतातील प्रमुख शहर आहे.

(अ) मुंबई

(ब) लुधियाना)

(क) कोचीन

(ड) कोलकता

उत्तर :- (ब) लुधियाना)

प्रश्न २ रा : पुढीलपैकी चुकीची जोडी ओळख व लिहा.

(१) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ – औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

(२) औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे.

(३) वस्त्रोद्योग समिती- विणकरांचे कल्याण करणे

(४) खादी व ग्रामोद्योग आयोग – ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणाला चालना देणे.

चुकीची जोडी : (३) वस्त्रोद्योग समिती- विणकरांचे कल्याण करणे

अचूक जाडी – वस्त्रोद्योग समिती – उत्पादित वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.


 प्रश्न २ रा : (ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा.

भारताचा अंतर्गत व्यापार :-

उत्तर :- भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यांमधून आणि शेतीतून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनाची विक्री भारतातील बाजारपेठांत करणे, यालाच ‘भारताचा अंतर्गत व्यापार’ असे म्हणतात. या अंतर्गत व्यापारात कोळसा,कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, तेलबिया, साखर, मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. अंतर्गत व्यापार लोहमार्ग, हवाईमार्ग, रस्ते या सर्व मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकता, कोचीन, चेन्नई या बंदरातूनही अंतर्गत व्यापार चालू असतो.

प्रश्न  ३ ला : (अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

उत्तर :-  भारतात विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रे अनेक ठिकाणी आहेत. राजवाडे, किल्ले, स्मारके, लेणी, नक्षीकाम केलेले प्राचीन वाडे अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. पर्वत, नद्यांचे संगम, जंगले, उद्याने, सागरकिनारे असा निसर्गसुंदर प्रदेश आहे. अशा विविध ठिकाणी प्रवाशांसाठी शासनाकडून आणि खाजगी व्यावसायिकांकडून विविध सोयी-सुविधा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

 (२) भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. 

उत्तर :- भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे. आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनही वाढत आहे. शेतीमुळे व औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. या सर्व विकासामुळे भारतीय जनतेच्या जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे.

प्रश्न ३ रा (ब) : पुढील प्रश्नाची २५-३० शब्दात उत्तरे लिहा.

(१) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?  

उत्तर :- शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते. 

१) ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

२) शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिले जाते.

३) शेती सहली व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात.

४)शेतकऱ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे आणि खते यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो. 

५) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, दुग्धव्यवसाय इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. 

६) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडूनही मार्गदर्शन होते.

७) उत्पादित माल साठवणुकीसाठीच्या गोदाम बांधणीसाठी शासन अर्थसाहाय्य देते.

८) शेततळी, पिक विमा संरक्षण, उत्पादित मालाची खरेदी करणे इत्यादी बाबतही शासन शेतकऱ्यांना मदत करते.



(२) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?

उत्तर :- पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळ-भाजी विक्रेते इत्यादींना रोजगार मिळतो. हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात. पर्यटन स्थळी रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले, फोटोग्राफर इत्यादींना रोजगार मिळतो. पर्यटन स्थळाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही रोजगार उपलब्ध होतो.



(३) भारतात वनस्पतींवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?

 उत्तर :- भारतात वनस्पतींवर आधारित पुढील व्यवसाय चालतात. 

१) काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग. 

२) कागद, वृत्तपत्रांचा कागद, पुठे इत्यादी निर्मितीचे उद्योग. 

३) रेशीम, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय,

४) औषधी वनस्पतींपासून औषधे तयार करणारे व्यवसाय. 

५) इमारतींसाठी लागणारे लाकूड, इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसाय.

४) भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा.

उत्तर :- कातडी कमावण्याचा उद्योग भारतभर चालू असतो. कातड्यापासून बूट, चप्पल तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. मऊ कातड्यापासून शोभेच्या विविध वस्त. पर्सेस, जाकीट अशा विविध वस्तू तयार करणारे व्यवसाय आहेत. विहिरीचे पाणी काढण्याच्या मोटा, मोठ्या बॅगा आदी तयार करण्याचेही व्यवसाय भारतभर चालतात. शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल इत्यादी वस्तू भारतातून निर्यात करण्याचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबईतील धारावी अशा ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.

प्रश्न ४. चौकट पूर्ण करा.

(उत्तर चौकट न देता लिहले आहे नोटबुक मध्ये लिहताना विध्यार्थ्यानी  चौकट काढावी)

भारतात आयात होणाऱ्या वस्तू :-

खनिज तेल, नैसर्गिक वायू, औषधे, खते, मोबाईल, टी.व्ही., यंत्रांचे पार्ट्स, लोखंड, लॅपटॉप, अद्यावत लष्करी सामग्री, लढाऊ विमाने, तोफा, पाणबुड्या, नौका, प्रवासी विमाने, रेल्वेचे डबे, इंजिने, आधुनिक तंत्रज्ञान, गरजेनुसार अन्नधान्य, डाळी, कांदे इत्यादी.

भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू :-
चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे व पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे, सिमेंट, हापूस आंबा, मोटारी, ट्रॅक्टर, रेल्वे इंजिने, सायकली इत्यादी.

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال