(१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.
(अ) डॉ. होमी भाभा
(ब) डॉ. होमी सेठना
(क) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
(ड) डॉ.राजा रामण्णा
उत्तर :- डॉ होमी भाभा
(२) इस्त्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला …….. हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
(अ) आर्यभट्ट
(ब) इन्सॅट १ बी
(क) रोहिणी-७५
(ड)अँपल
उत्तर :- अँपल
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(१) पृथ्वी – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
(२) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र.
(३) आकाश – जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र.
(४) नाग – शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र.
उत्तर :- (२) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र.
अचूक जोडी :- अग्नी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
प्र.२ (अ) भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.
(खालील उत्तर कालरेषा न देता दिले आहे नोटबुकमध्ये लिहताना कालरेषा काढून त्याखाली वर्षांनुसार माहिती लिहा )
१९६१ – भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण
१९७४ – पहिली यशस्वी अणुचाचणी
१९७५ – आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण
१९८१ – भास्कर -२ या उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण
१९८४ – रेल्वेची संगणीकृत आरक्षण व्यवस्था सुरु करण्यात आली.
२००० – दूरसंचार विभागातील पुनर्रचना
(ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) अवकाश संशोधन :
उत्तर :- अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्वअंदाज घेणे, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला ‘अवकाश संशोधन’ असे म्हणतात. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली आहे. अवकाश संशोधनात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो.
(२) टेलेक्स सेवा :
उत्तर :- देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमद्रित स्वरूपात संदेश वहन करणे म्हणजेच ‘टेलेक्स सेवा’ होय. भारतात १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केली. १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत व नंतर भारतभर सुरू झाली. सर्वच क्षेत्रांत सेवेचा वापर सुरू झाला. १९९० नंतर इंटरनेटचा उदय झाल्यावर या सेवेचे महत्व संपुष्टात आले.
प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प.नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
उत्तर :- पुढील उद्देश डोळ्यासमोर ठेवून प.नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
१) भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे.
२) प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.
३) अणुऊर्जेचा वीजनिर्मिती व अन्य विधायक कामांसाठी उपयोग करणे.
४) नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणे.
(२) भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
उत्तर :- भारताच्या शेजारील चीन अण्वस्त्रसज्ज देश आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्रसज्ज होऊ पाहत होता. भारताला संरक्षणाची आवश्यकता होती. शांतता व स्वंयपूर्णता या कारणांसाठी भारताने १९७४ मध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
(३) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
उत्तर :- आपली अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. एका हायड्रोजन बॉम्ब चाचणीसह एकूण तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. अण्वस्त्रांचा प्रथम वापर भारत करणार नाही, असे भारताकडून जाहीरही करण्यात आले. परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता; म्हणून अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले.
प्रश्न ४ था : पुढील प्रश्नाची २५-३० शब्दात उत्तरे लिहा.
(१) पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा.
उत्तर :- भारताशेजारील अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्र तयार करू पाहणारा पाकिस्तान यांच्याकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी भारताला अण्वस्त्र बनवणे आवश्यक होते. शांतता व स्वयंपूर्णता हे भारताचे धोरण होते. त्यानुसार भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. मानवी वस्तीपासून लांब व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही, या अटींनुसार पोखरण हे ठिकाण या चाचणीसाठी निवडण्यात आले. १९९८ सालीही दुसऱ्यांदा या ठिकाणी अणुचाचण्या घेतल्या गेल्या.
(२) भास्कर-१ हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे ?
उत्तर :- भास्कर-१ हा उपग्रह पुढील क्षेत्रांसाठी उपयोगी आहे.
(१) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने करणे.
(२) भूगर्भातील पाण्याचे व खनिजांचे साठे शोधणे.
(३) हवामानाचा अंदाज घेणे.
(४) भूगर्भ, पर्यावरण व जंगलविषयक छायाचित्रे घेणे.
(५) समुद्रविज्ञान विकसित करणे.
प्रश्न ५ वा : पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो.
उत्तर :- माझ्या वापरात असणाऱ्या पुढील सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे.
१) मोबाईल २) संगणक ३) रेडिओ ४) टी.व्ही.
वरील माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ई-मेल वा फोटो पाठवता येतात. हवामानाचा अंदाज घेता येतो. माझ्या वापरात असणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या याही उपग्रहाद्वारेच आलेल्या असतात.
(२) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधले जाते ?
उत्तर :- १९८३ नंतर संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ.कलाम यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’ या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्यात आली. असे बहमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना म्हणूनच ‘मिसाईल मॅन’ असे संबोधले जाते.
(३) संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते ?
उत्तर :- संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी IRCTC (Indian Railways _Catering and Tourism Corporation) यांचे अधिकृत वेबसाइट व ऍप उपलब्ध आहेत. वेबसाइट किंवा ऍपच्या साहाय्याने तुम्ही कधीही हव्या त्या प्रकारच्या रेल्वेचे तिकिट घरी बसून बूक करू शकता. तिकिट बुकिंग मध्ये १९ वेगवेगळे कोटे उपलब्ध आहेत. महिला प्रवाशांना आरामात तिकिट बुकिंग करण्यासाठी, कमी वयाच्या मुलांना तसेच अपंग व्यक्तींना विशेष कोटा उपलब्ध आहे. सर्व माहिती भरल्यानंतर युनिक पिन कोड (PNR (Passenger Name Record) जनरेट होतो. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या रेल्वेची सद्यस्थिती समजू शकता. ( ट्रेन वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर ट्रेनची तिकिटे बूक करायची की नाही किंवा – केव्हाची तिकिटे बूक करायची हे समजण्यास तुम्हाला मदत होईल. कोणत्याही कारणाने तिकिट रद्द करायचे असेल तर थोड्या नुकसानासह तिकिट रद्द करता येते. पेमेंट यूपीआय, वॉलेट्स, पेटीएम किंवा फोन पे इत्यादी द्वारा करता येते. २४ तासाच्या आत तिकिट बूक करायचे असेल तर तत्काल बुकिंग सेवा उपलब्ध असते. १० ते ११ किंवा ११ ते १२ सकाळ या कालावधीत ही तिकिटे बूक करता येतात. ही तिकिटे एकदा कन्फर्म केल्यानंतर परत रद्द करता येत नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र-जवळ असणे आवश्यक आहे.
(४) कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
उत्तर :- १९९८ साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेची पुढील वैशिष्ट्ये आहेत.
१) या रेल्वेचा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा आणि चार राज्यांना जोडणारा आहे.
२) या मार्गावर एकूण १२ बोगदे असून त्यातील करबुडे येथील ६.५ किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे.
३) या मार्गावर १७९ मोठे व १८१९ छोटे पूल असून शरावती नदीवरील बांधलेला २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वात लांब आहे.
४) रत्नागिरी जवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा सर्वात मोठा उंच पूल आहे.