(१) इ.स.१९९२ मध्ये आंध्र प्रदेश. या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
(अ) महाराष्ट्र
(ब) गुजरात
(क) आंध्र प्रदेश)
(ड) उत्तराखंड
उत्तर :- (क) आंध्र प्रदेश)
(२) भारत सरकारने १९७५ मध्ये . …………………. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
(अ) डॉ. फुलरेणू गुहा
(ब) उमा भारती
(क) वसुंधरा राजे
(ड) प्रमिला दंडवते
उत्तर :- (अ) डॉ. फुलरेणू गुहा
२. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
(१) सौदामिनी राव – स्त्रीमुक्ती आंदोलन समिती
(२) विद्या बाळ – नारी समता मंच
(३) प्रमिला दंडवते – महिला दक्षता समिती
(४) ज्योती म्हापसेकर – महिला आयोग
उत्तर :- (४) ज्योती म्हापसेकर –
( अचूक जोडी ‘मुलगी झाली हो हे पथनाट्य )
प्रश्न ४ था : संकल्पना स्पष्ट करा.
(१) पोटगी :
उत्तर :- एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे, याला ‘पोटगी’ असे म्हणतात. या कायद्यामुळे घटस्फोटित स्त्रीचे जीवन सुसह्य बनले. भारतात विविध धर्मीयांसाठी पोटगीचे
वेगवेगळे कायदे आहेत.
(२) अल्पसंख्याक :
उत्तर :- एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला ‘अल्पसंख्यांक’ असे म्हणतात. या अल्पसंख्याकांना आपल्या संस्कृतीचे, भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी संविधानाने त्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत.
प्रश्न ५ वा : पुढील विधाने साकारणं स्पष्ट करा.
(१) स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
उत्तर :- १९७५ मध्ये स्त्री मक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली. १९७८ मध्ये या समितीने लिंगभेद, जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले. अनेक महिलांनी नियतकालिके, पथनाट्ये, गीतसंग्रह, संस्थागट स्थापण करणे असे उपक्रम सुरु केले. स्त्री अत्याचाराविरोधी परिषदा घेण्यात आल्या. अनेक पक्षांनी, संघटनांनी हुंडा, स्त्री भ्रूणहत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष केले. स्त्री प्रश्नांवर संशोधने सुरू झाली. या सर्व कृतींतूनच स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात झाली.
(२) १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
उत्तर :– भारतात १९६१ चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडतच होते. या प्रकारांची चौकशी झाल्यावर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते. पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे, असेच मत देत होते. त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी १९८४ मध्ये हंडाबंदी
सुधारणा कायदा करण्यात आला.
(३) अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
उत्तर :- भारतात अनेक वर्षे अस्पृश्यता पाळली जात असे. या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाखीचे बनले होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. हे घटनात्मक अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते. म्हणून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट करण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
(४) संविधानाने अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
उत्तर :- भारतात विविध धर्मांचे, पंथांचे, संस्कृतींचे आणि विविध भाषिक लोक राहतात. यातील अल्पसंख्य समूहांना आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा, आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे. आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत. यासाठीच संविधानाने अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
प्रश्न ६ वा :पुढील प्रश्नाची २५-३० शब्दात उत्तरे लिहा.
(१) चिपको आंदोलनाची माहिती लिहा.
उत्तर :- स्त्रीशक्तीचा विधायक अविष्कार १९७३ च्या चिपको आंदोलनात दिसून आला. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलांतील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर देण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला ‘चिपको आंदोलन’ म्हणतात. आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेत महिलांचा व्यापक सहभाग होता.
(२) मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती लिहा.
उत्तर :- १९९३ साली केंद्र शासनाने स्त्री-पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘मानव अधिकार संरक्षण कायदा संमत केला. या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. सामुहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली. स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
प्रश्न ७ वा : पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा. स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होते.
उत्तर :-
१) ऐन दिवाळीत अनेक वस्तू बाजारातून गायब होऊन विकल्या गेल्या, या विरुद्ध स्त्रियांनी काढलेल्या ‘लाटणे मोर्चा’ ला यश मिळाले.
२) वृक्षतोडीविरुद्ध सुरु झालेल्या चिपको आंदोलनात किंवा राजस्थानातील बिष्णोई आंदोलनात स्त्रियांचा वाट मोठा होता.
३) आंध्र प्रदेशात मद्यपानविरोधी चळवळीत स्त्रियांनी अरक विक्रीची दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारूविक्री विरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले.
(४) महाराष्ट्रात झालेले हुंडाविरोधी आंदोलन, स्त्री अत्याचारविरोधी आंदोलन, स्त्री मुक्ती संघर्ष समिती इत्यादींमध्ये स्त्रिया सक्रिय होत्या, म्हणनच स्त्रियांवरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली.