१ . 'जनपदे' म्हणजे काय ?
उत्तर -वैदिक उत्तर कालखंडात भारतीय उपखंडात ची छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हणतात .
२ . 'महाजनपदे 'म्हणजे काय ?
उत्तर - ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढवून ती बलशाली झाली अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणत .
३ .बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली ?
उत्तर - बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली .
४ .वजनमापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली ?
उत्तर - वजन मापाची प्रमाणित पद्धत नंद राजाने सुरू केली .
प्र .२ . सांगा पाहू .
१ .आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता . - अश्मक
२ .जन पदांमध्ये हे राज्य कारभारासंबंधी चे निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींची असणारी समिती . - गणपरिषद
३ .जनपदांमध्ये राज्यकारभाराविषयीच्या चर्चा येथे होत असत, त्या सभागृहाला असे म्हणत -संथागार
४ .गौतम बुद्ध या गणराज्यातील होते . - शाक्य
५ .चतुरंग सैन्य ही चार दले मिळून तयार होई- पायदळ ,घोडदळ , रथदळ व हत्तीदळ .
प्र३ .जोड्या जुळवा .
अ गट ब गट
१ ) संगिती अ ) अजातशत्रू
२ )धनानंद ब ) परिषद
३ )पाटलीग्राम क)महागोविंद
ड )नंदराजा
उत्तरे -
१ ) -ब) २ ) -ड ) ३ ) -अ )