3 . हडप्पा संस्कृती


प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ ) या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव का मिळाले असावे ?
उत्तर - इ.स. १९२१ मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्थेचा शोध लागल्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे .

२ ) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे ?
उत्तर - हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यात माशांचे खवले ,एकमेकांत गुंतलेली वर्तुळे ,पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे .

३ ) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत ?
उत्तर - हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमल चे कापड पुरवत असत .

प्रश्न२ . प्राचीन स्थळांना भेटी देताना तुम्ही काय कराल ?
उत्तर -व्यक्तीचे ठिकाण निश्चित करणे ,त्या स्थळाची चित्रे व माहिती गोळा करणे,त्या ठिकाणचे नियम शिस्त पाळणे.कॅमेरा ,वही-पेन ,साधनांची यादी व प्रवासाची तयारी करणे,माहितीची नोंद करणे. या गोष्टी आम्ही प्राचीन स्थळांना भेटी देताना करू .
प्रश्न३ . मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा .

प्रश्न४हडप्पा कालीन लोक जीवनाची माहिती देणारा तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा .
उत्तर - 
* मुख्य पिके -
गहू ,सातू, वाटाणा, तीळ, मसूर, कापूस .

* पोशाख-
सुती - लोकरी कापड यांचा वापर स्त्री-पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे वापरत .

* अलंकार -
सोने, तांबे ,रत्ने, शिंपले, कवड्या, बिया यांचे दागिने, अनेकपदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद कंबरपट्टा ,बांगड्या

प्रश्न५ . एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा .

१ ) हडप्पा संस्कृतीचा मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड - स्टिएटाईट

२ ) हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव - सिंधू संस्कृती

३)सिंधू नदीच्या खोऱ्यातील नगर - मोहेंजोदडो

४ )हडप्पा येथील उत्खनन या साली सुरू झाले - इ.स. १९२१


Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال