(१) परम – ८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ –
(अ) डॉ. विजय भटकर
(ब) डॉ.आर.एच.दवे
(क) पी.पार्थसारथी
(ड) वरीलपैकी कोणीही नाही.
उत्तर :- डॉ. विजय भटकर
(२) जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
(अ) बालभारती
(ब) विद्या प्राधिकरण
(क) विद्यापीठ शिक्षण आयोग
(ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
उत्तर :- (ब) विद्या प्राधिकरण
(३) आय.आय.टी ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
(अ) कृषी
(ब) वैद्यकीय
(क) कुशल दर्जाचे व्यवस्थापक
(ड) अभियांत्रिकी
उत्तर :- (ड) अभियांत्रिकी
प्रश्न २ रा : दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
(१) भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती -- कार्य
भारताचे पहिले शिक्षणमंत्री--- विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
प्रा. सय्यद राऊफ अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे.
अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प
(२) ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा.
उत्तर :- नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT ही भारत सरकारची सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे. शालेय शैक्षणिक मुद्द्यावर केंद्रसरकारच्या मदतीसाठी इ.स. १९६१ मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली.
प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
उत्तर:- स्वातंत्र्योत्तर भारतातील सरकार समोर निरक्षरता हे एक मोठे आव्हान होते. शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा नव्हत्या. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा वाढविणे आवश्यक होते. या सर्व कारणांमुळे १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ‘जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह सात राज्यांत हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची १०० % उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण समाजजागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होतो.
२) NCERT ची स्थापना करण्यात आली.
उत्तर :- केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी NCERT ची स्थापना करण्यात आली. शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT च सांभाळते. राज्य शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERT ने उपलब्ध करून दिले. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी NCERT ची स्थापना करण्यात आली.
(३) भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.
उत्तर :- १९०५ मध्ये भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन संस्था सुरू झाली. १९५८ मध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कषिशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागाद्वारे या विद्यापीठाने विविध कार्य केले आणि करत आहे. गहू, कडधान्य, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर या संस्थेने संशोधन केले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे या संस्थेने एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन केले आणि त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला.
प्रश्न ४ था : टीपा लिहा .
(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
उत्तर :- देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. १९७४ मध्ये सरकारने पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशीनुसार २० सप्टेंबर १९८५ रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली.
विद्यापीठाने १९९० मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक्-श्राव्य पद्धतीने दुरुस्त शिक्षण कार्यक्रम सुरू केला. या विद्यापीठाने विविध शाखांमधून एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात ५८ प्रशिक्षण केंद्रे व परदेशात ४१ केंद्र स्थापन करून याच विद्यापीठाने सर्वांची शिक्षणाची सोय केली.
(२) कोठारी आयोग
उत्तर :- १९६४ मध्ये डॉ.डी.एस.कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १०+२+३ या आकृतिबंधाचा स्विस्कार केला. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती-जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारसी या आयोगाने केल्या. शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
(३) भाभा अटोमिक रिसर्च सेंटर
उत्तर :- भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. डॉ. होमी भाभा हे या दोन्ही संस्थांचे संचालक होते. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स इत्यादी विषयांत मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढले. अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती उद्योग व वैद्यकिय क्षेत्रात त्याचा उपयोग केला.
(४) बालभारती
उत्तर :- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. ‘किशोर’ हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते.
प्रश्न ५ वा : पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ‘खडू-फळा’ (ऑपरेशन ब्लॅक बोड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो ? ‘खडू-फळा’ या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो.
उत्तर :-
१) प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे.
२) प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे.
३) किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे. ‘खडू-फळा’ या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो.
४) सुयोग्य अशा किमान दोन वर्गखोल्या, स्वच्छतागृह, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडासाहित्य इत्यादींसाठी सरकारी शाळांना निधी उपलब्ध करून देणे.
५) दोन शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षिका नियुक्त करणे.
(३) शेतीच्या विकासात कृषी विद्यालये / महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?
उत्तर :- कृषी विद्यालये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम राबवतात. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात. एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन केले जाते. सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात. या महाविद्यालयांतून मृदाशास्त्र, कृषिशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विविध अभ्यासक्रम राबवले जातात. अशा रीतीने शेतीच्या विकासात कृषी विद्यालये व महाविद्यालये आपली भूमिका बजावतात.
(३) भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर :- वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी १९४९ साली भारताच्या वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना झाली. विविध रोगांवर संशोधन करणारे २६ केंद्र देशभरात सुरू झाले. या संस्थांच्या संशोधनामुळे क्षयरोगावर व कृष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय स्थापन केले. सुसज्ज सार्वजनिक स्थळे सुरू केली. माफक दरात वैद्यकीय उपचार, परिचारिकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालये स्थापन केले. हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकार यांवरील उपचारांसाठी स्पेशालिटी केंद्र सुरू केली.
(४) तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा.
उत्तर :- आमच्या शाळेत शैक्षणिक सहल, बाजारभेट, पाणी शुद्धीकरण केंद्रास भेट, विजनिर्मिती केंद्रास भेट, परिसरात असणाऱ्या लघू उद्योग व कारखान्यांस भेट, प्राचिन वस्तुसंग्रहालय व वास्तूस भेट तसेच शाळेत निवडणूक घेऊन मंत्रिमंडळ स्थापन करून विविध मंत्र्यांची नेमणूक करणे व त्यानुसार शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबविणे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे.उन्हाळ्यात प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई चालवणे.गाडगेबाबा जयंतीच्या दिवशी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करणे व विविध मार्गांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे. विविध सामाजिक बदलांसाठी प्रभातफेरी, एकांकिका, भाषणे इत्यादींद्वारा समाज जागती करणे, नैसर्गिक संकटात अडकल्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मदत करणे. इत्यादी विविध शालेय आणि सहशालेय उपक्रम आमच्या शाळेत राबविले जातात.