१ ) जैन धर्मात ................या तत्वाला महत्त्व दिलेले आहे.
२ ) सर्व प्राणीमात्रांविषयी........... हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते .
उत्तरे : १ ) अहिंसा २ ) करुणा
प्रश्न २ . थोडक्यात उत्तरे द्या .
१ ) वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली ?
उत्तर -वर्धमान महावीर यांनी लोकांना पुढील शिकवण दिली -१ .मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर नसून उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो .२ .सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा ३ .मनामध्ये इतरांबद्दल दया व करून असू द्या .४जगा आणि जगू द्या .
२ ) गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे ?त्यातून कोणती मुल्ये प्रकट होतात ?
उत्तर - 'छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते ' हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे यातून स्वातंत्र्य व समता ही मूल्ये प्रकट होतात .
३ ) ज्यू धर्माची शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे ?
उत्तर -ज्यू धर्माच्या शिकवणीत सत्य, शांती, न्याय ,करुणा, प्रेम, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे व स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे.
४ ) ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे ?
उत्तर - ख्रिश्चन धर्मामध्ये देव एक नसून तो शक्तिमान आहे सर्वांचा प्रेमळ पिता आहेयेशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवाच्या उद्धारासाठी ते भूमीवर आले होतेआपण सर्वांवर तसेच शत्रू वर देखील प्रेम केले पाहिजे चुकलेल्यांना आपण क्षमा केली पाहिजे या गोष्टी सांगितल्या आहेत .
५ ) इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते ?
उत्तर - अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्याचे प्रेषित आहेत .अल्लाह सर्वकाळी व सगळीकडे आहेतू सर्वशक्तिमान दयाळू आहेअल्लाहची उपासना करणे हा माणसाच्या जीवनाचा मुख्य हेतू आहे वरील गोष्टी इस्लाम धर्माची शिकवण सांगतात .
६ ) पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे ?
उत्तर - पारशी धर्मामध्ये अग्नी व पाणी ही दोन तत्त्वे महत्त्वाचे आहेत चांगले विचार चांगली वाणी आणि चांगली कृती या तीन प्रमुख तत्वांचे आचरण करणे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे .
प्रश्न३ .टिपा लिहा .
१ ) आर्यसत्ये-
गौतम बुद्धांच्या मते माणसाच्या जीवनातील सर्व व्यवहाराच्या मूळाशी चार सत्य असतात त्यांना आर्यसत्य असे म्हणतात .ती पुढील प्रमाणे आहेत .
१ .दुःख -मानवी जीवनात दुःख असते
२ .दुःख कारण - दुःखाला काहीतरी कारण असते .
३ .दुःख निवारण- दुःख दूर करता येते .
४ .प्रतिपद- शुद्ध आचरणाने दुःखाचा अंत करता येतो .
२ ) पंचशील -
गौतम बुद्धांनी लोकांना पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले ते पाच नियम म्हणजे पंचशील होय .त्यामध्ये १ )प्राण्यांची हत्या करू नये . २ )चोरी करू नये .३ )अनैतिक आचरण करू नये .४ )असत्य बोलू नये .५ ) मादक पदार्थांचे सेवन करू नये .
प्रश्न ४ .खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा .
अहिंसा ,सम्यक, दर्शन, सत्य ,अस्तेय, सम्यक ,ज्ञान ,अपरिग्रह, सम्यक, चारित्र्य ,ब्रह्मचर्य.
उत्तर -
* पंचमहाव्रते -
अहिंसा ,सत्य ,अस्तेय, अपरिग्रह , ब्रह्मचर्य .
* त्रिरत्ने -
सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य .
प्रश्न ५ .कारणे लिहा .
१) वर्धमान महावीर यांना 'जिन 'असे म्हटले जाऊ लागले.
उत्तर -वर्धमान महावीर यांनी घरादाराचा त्याग करून साडे बारा वर्षे तपश्चर्या केली व विशुद्ध ज्ञान प्राप्त केले .वर्धमान महावीर यांनी सर्व विकारांवर विजय मिळवला म्हणुन त्यांना जीन म्हणजे विकारांवर विजय मिळवणारा असे म्हटले जाऊ लागले .
२ ) गौतमांना 'बुद्ध ' असे म्हटले जाऊ लागले ?
उत्तर - मानवी जीवनात दुःख का आहे ? याचा शोध घेण्यासाठी गौतमांनी घरादाराचा त्याग केला आणि ध्यानधारणा केली त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले .