4 .वैदिक संस्कृती


प्रश्न१ . पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा .

१ ) वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया - 
उत्तर - लोपामुद्रा ,गार्गी ,मैत्रेयी.

२ ) वेदकालीन मनोरंजनाची साधने -
उत्तर - गायन, वादन ,नृत्य ,सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती व शिकार .

३ ) वेदकालीन चार आश्रम-
उत्तर - ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.

प्रश्न२ .चूक की बरोबर ते ओळखा .

१ ) यज्ञात म्हटले जाणारे मंत्र- ऋग्वेद
उत्तर - चूक .

२ ) अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद - अथर्ववेद
उत्तर - बरोबर .

३ ) यज्ञ विधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद - सामवेद 
उत्तर - बरोबर

प्रश्न३ . एका शब्दात उत्तरे लिहा .

१ ) वैदिक वांड्मयाची भाषा - संस्कृत

२ ) विद म्हणजे - जाणणे .

३ ) गोधूम म्हणजे - गहू .

४ ) घराचा प्रमुख म्हणजे - गृहपती .

५ ) व्यवसायिकांच्या श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत - श्रेष्ठी .

प्रश्न४ . नावे लिहा

१ ) तुम्हास माहित असलेली वाद्य -
उत्तर -बासरी ,तबला, वीणा, सतार, गिटार ऑर्गन .

२ ) सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने -
उत्तर -मंगळसूत्र ,पाटल्या, अंगठ्या, नेकलेस ,चेन, ब्रेसलेट, गंठण.

३ ) सध्याची मनोरंजनाची साधने -
उत्तर- टीव्ही ,मोबाइल ,खेळ, नाटक, चित्रपट.

प्रश्न५ . थोडक्यात उत्तरे लिहा .

१ ) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता ?

उत्तर -वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये गहू सातू तांदूळ या तृणधान्य यांचा तसेच उडीद मसूर तीळ मांस दूध दही तूप लोणी मध या पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश होता .

२ ) वेदकाळात गाईंची विशेष काळजी घेतली जाई ?
उत्तर - वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व त्यापासून तयार केलेले पदार्थ आवडायचे ,तसेच त्या काळात गायींना विशेष किंमत असे आणि अशा उपयुक्त काही कोणी चोरून नेऊ नये म्हणून वेगळा त्यांची विशेष काळजी घेतली जाई .

३ ) संन्यास आश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती ?
उत्तर - संन्यास आश्रमात मनुष्याने सर्व ना त्यांचा त्याग करावा मनुष्यजन्म याचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एकेठिकाणी राहू नये अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती .

प्रश्न६ . थोडक्यात टिपा लिहा .

१ ) वेदकालीन धर्मकल्पना -

वेदकालीन लोकांनी निसर्गातील वारा, सूर्य, पाऊस ,नद्या, वीज ,पृथ्वी, निसर्गशक्तिंना देवता मानले आणि या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात.त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत या यज्ञविधी ला फार महत्त्व होते .

२ ) वेदकालीन घरे -

वेदकाळातील घरे कुडाची किंवा मातीची असत वेलींचे गवतांची जाडसर तट्टे विणून त्यावर माती व शेण लिपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात .त्यात घरांची छपरे उतरती होती .घरातील जमीन शेणाने सारवली जात असे .

३ ) वेदकालीन शासनव्यवस्था -

वेद काळात राज्याची रचना ग्राम वसाहत त्यांचा समूह जन्वर जनपद अशी होतीप्रत्येक विभागाचा एक प्रमुख अधिकारी होतारोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारीराजाला मार्गदर्शन करण्यासाठी समिती, सभा, जन , विदथ अशा चार संस्था होत्या .समितीत लोकांचाही सहभाग होता तसेच ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता .

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال