3.पृथ्वी गोल,नकाशा व क्षेत्रभेट

 


(१)  द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती ?



उत्तर:


द्विमित साधनांची वैशिष्ट्ये


नकाशे हे द्विमिती असतात .


द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळत तयार होते.


त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये


पृथ्वीगोल हा त्रिमित असतो.


त्रिमित वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते, तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते.


 


(२) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील?


उत्तर:    अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते, रेखावृत्ते दाखवता येतील. तसेच पृथ्वीवरील भूभाग, देश, बेट, सागर, महासागर इत्यादी बाबी दाखवता येतील.


 


(३)   पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल?


उत्तर: पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वीगोल या साधनाच्या माध्यमातून समजून घेणे सोपे होईल.


 


(४)   तुमचे गाव / शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल?


उत्तर: आमचे गाव व शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी ठरेल.


 


(५)  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते?


उत्तर: नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल


Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال