१ ) सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई ?
उत्तर - सुरुवातीच्या काळात लिहीण्यासाठी खापरे , कच्च्या विटा ,झाडाची साल , भूर्जपत्रे,तांब्याच्या धातूचा पत्रा,शिळा इत्यादी साधनांचा उपयोग केला जाई .
२ ) वेदवाङमयातून कोणती माहिती मिळते ?
उत्तर - वेदवाङमयातून इसवी सन पूर्व १५०० पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते .
३ ) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे ?
उत्तर - मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते ,लोककथा इत्यादी साहित्य जतन करून ठेवले आहे .
प्रश्न२ . पुढील साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक साधने यात वर्गीकरण करा .
ताम्रपट ,लोककथा ,मातीची भांडी, मणी ,प्रवासवर्णने ,ओव्या, शिलालेख, पोवाडे ,वैदिक साहित्य, स्तूप, नाणी ,भजन पुराणग्रंथ ,धान्याचे कण ,किल्ले ,लोकगीते, शस्त्रे ,दागिने .
उत्तर -
* भौतिक साधने -
मातीची भांडी, मणी ,स्तूप , नाणी, धान्याचे कण ,किल्ले, शस्त्रे, दागिने .
* लिखित साधने -
ताम्रपट ,प्रवासवर्णने, शिलालेख, पुराणग्रंथ ,पोवाडे, वैदिक साहित्य.
* मौखिक साधने -
लोककथा, ओव्या, भजन, लोकगीते.