१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताचे ..... हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) राष्ट्रपती
(क) संरक्षण मंत्री
(ड) राज्यपाल
(२) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल.......
(अ) भूदल
(ब) तटरक्षक दल
(क) सीमा सुरक्षा दल
(ड) जलद कृतिदल
(३) विदयार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी.......'ची स्थापना करण्यात आली.
(अ) बी. एस. एफ.
(ब) सी. आर. पी. एफ.
(क) एन. सी. सी.
(ड) आर. ए. एफ.
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
उत्तर:
हे विधान बरोबर आहे; कारण -
(१) सामान्य माणसांत दहशत किंवा भीती निर्माण करून, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा
दहशतवादाचा हेतू असतो.
(२) अशी दहशत निर्माण करून आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे दहशतवादी लोक साध्य करीत
असतात.
(३) दहशत पसरवून आपला प्रभाव निर्माण करणे, गैरकृत्ये करणे हे हेतू त्यात दडलेले असतात; त्यामुळे
मानवी सुरक्षितता धोक्यात येते; म्हणून दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
(२) प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.
उत्तर:
हे विधान बरोबर आहे; कारण -
(१) राष्ट्राराष्ट्रांत सीमावाद, पाणीवाटपावरून वाद असे तंटे चालू असतात.
(२) अशा वेळी परस्परविरोधी हितसंबंध निर्माण होऊन आक्रमक राष्ट्रे दुसऱ्या राष्ट्रावर स्वारीही करतात.
(३) कोणत्याही राष्ट्राला आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे आवश्यक असते व ते त्याचे
पहिले कर्तव्यही असते. म्हणून प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.
(३) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.
उत्तर:
हे विधान चूक आहे; कारण
(१) काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने आजपर्यंत चार वेळा भारतावर आक्रमण केले.
(२) पाकिस्तान नेहमीच भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो.
(३) सिंधू नदी पाणीवाटपाबाबत भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षे तंटा चालू आहे; त्यामुळे भारत व
पाकिस्तान यांच्यात सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत.
३. टीपा लिहा.
(१) जलद कृतिदलाचे कार्य
उत्तरः
संरक्षण दलांना साहाय्य करण्यासाठी जी निमलष्करी दले स्थापन करण्यात आली आहेत, त्यात जलद
कृतिदलाचा समावेश होतो. जलद कृतिदल पुढील कार्य करते :
(१) बॉम्बस्फोट, दंगे अशा स्फोटक परिस्थितीत सापडलेल्या निरपराध जनतेला मदत करते.
(२) देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास, अशा परिस्थितीत वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत
करण्याचे काम करते.
(२) मानवी सुरक्षा.
उत्तर:
(१) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे; तर देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा, हा
नवा विचार शीतयुद्धानंतर पुढे आला.
(२) मानवी सुरक्षेत निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य
अशी परिस्थिती निर्माण करणे, याचाही समावेश होतो.
(३) अल्पसंख्य व दुर्बलांचे रक्षण ही बाबही मानवी सुरक्षेत समाविष्ट असते.
(४) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे, ही बाबही विचारात घेतली जाते.
(३) गृहरक्षक दल.
उत्तर:
(१) गृहरक्षक दल ही सैनिकी जीवनाचा अनुभव देणारी संघटना स्वातंत्र्यपूर्व काळातच स्थापन झाली.
(२) वीस ते पस्तीस वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकास स्वेच्छेने या दलात सहभागी होता येते.
(३) गृहरक्षक दल पोलिसांच्या बरोबरीने अनेक मानवी व नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांना उपयोगी
पडते.
४. आपले मत व्यक्त करा.
(१) भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणत्या दलात सहभागी व्हायला तुम्हांला आवडेल? का ?
उत्तर: (१) भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित वायुदलात सहभागी व्हायला मला आवडेल.
(२) वायुदलात मोठी आव्हाने असतात. वेगवान अशी लढाऊ विमाने, थरारक अनुभव देणारी त्यांची उड्डाणे,
शत्रूवर अचूक हल्ला करणे, नवे नवे तंत्रज्ञान या सर्व बाबी मला आकर्षित करतात.
(३) वायुदलातील सर्व सैनिक किती उत्साही दिसतात. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या वायुदलातील सैनिक
हिमालयाच्या उंच उंच शिखरांवर भरारी मारतात.
(४) अति थंड अशा लेह-लडाखमध्ये राहून देशाची सेवा करतात. म्हणून मला वायुदलात सहभागी व्हायला
आवडेल.
(२) शांततेसाठी अणुशक्ती' या धोरणाविषयी तुमचे मत व्यक्त करा.
उत्तर: (१) अणुशक्तीचे शांततेसाठी आणि विघातक कारणासाठी असे दोन्ही प्रकारे उपयोग होऊ शकतात.
(२) भारताने 'शांततेसाठी अणुशक्ती' हे धोरण स्वीकारले आहे, व ते माझ्या मते योग्य आहे.
(३) अणुशक्तीचा वीजनिर्मिती, संशोधन अशा विकासकामांसाठी उपयोग करायचा, हे धोरण असले पाहिजे.
(४) यामुळे मानवाचा विकास होतो. मानवी जीवन सुरक्षित व भयमुक्त राहते.
(५) अण्वस्त्रे नष्ट झाली पाहिजेत. अण्वस्त्रांमुळे मानवांत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. 'शांततेसाठी
अणुशक्ती' हे धोरण मानवी सुरक्षेसाठी योग्य व चांगले आहे, असे माझे मत आहे.
५. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो?
उत्तरः राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो.
(१) राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास.
(२) दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास.
(३) धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास.
(४) देशात दहशतवाद वाढल्यास.
(२) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.
उत्तरः सीमा सुरक्षा दल पुढील कामे करते:
(१) देशाच्या सीमांचे शत्रूपासून संरक्षण करणे.
(२) सीमा भागात होणारी तस्करी रोखणे.
(३) सीमेवर गस्त घालणे.
(४) सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.
(३) 'मानवी सुरक्षा' म्हणजे काय?
उत्तर: (१) देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे 'मानवी सुरक्षा' होय.
(२) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या
संधी देणे अपेक्षित असते.
(३) निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा व मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी अनुकूल
परिस्थिती निर्माण करणे, ही बाब मानवी सुरक्षेत समाविष्ट होते.
(४) अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षण या बाबींचाही मानवी सुरक्षेत समावेश आहे.
६. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१. सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः
२. भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा.
उत्तर:
0 Comments