१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश
(अ) लष्करी क्षमता निर्माण करणे
(ब) अणुचाचणी करणे
(क) अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे
(ड) ऊर्जेची निर्मिती करणे हा होता.
उत्तर - ड)
(२) जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट....... हे बनले आहे.
(अ) आण्विक विकास
(ब) आर्थिक विकास
(क) अणुचाचणी
(ड) सुरक्षा व्यवस्था
उत्तर - ब
(३) भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे......
(अ) मुक्त आर्थिक धोरण
(ब) परस्परावलंबन
(क) अलिप्ततावाद
(ड) आण्विक विकास
उत्तर -क
(४) इ. स. १९७४ मध्ये भारताने ..... या ठिकाणी अणुचाचणी केली.
(अ) श्रीहरिकोटा
(क) पोखरण
(ब) थुंबा
(ड) जैतापूर
उत्तर - क
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण -
(१) कम्युनिस्ट चीनला युनोचे सदस्य देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या देशांत भारत आघाडीवर होता.
(२) १९५४ साली चीनचे पंतप्रधान चौ-एन लाय व भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या भेटीने हे संबंध
अधिक दृढ झाले.
(३) या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्त्वांच्या आधारे मैत्री करार घडून आला. अशा रितीने पंडित नेहरूंनी
भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले.
(२) अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यात पुढाकार घेतला.
उत्तर: हे विधान बरोबर आहे: कारण-
(१) पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रांत शांतता निर्माण
करण्यासाठी चर्चा केली.
(२) १९९९ साली वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट देऊन शांततेसाठी व विकासासाठी लाहोर करार केला.
(३) वाजपेयी यांच्याच प्रयत्नाने लाहोर ते नवी दिल्ली अशी 'समझोता एक्स्प्रेस' ही रेल्वेसेवा व 'सदा ए सरहद
ही बससेवा सुरू झाली. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली.
३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) भारताचे परराष्ट्र धोरण
उत्तर: (१) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्य देशांशी कसे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणास
'परराष्ट्र धोरण' असे म्हणतात.
(२) १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्याने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली.
(३) भारताचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारलेले
आहे.
(४) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यावर भारत भर देतो.
(५) भारताच्या संविधानात कलम ५१ मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या यादीप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण आखले जाते.
(२) राष्ट्रीय हितसंबंध.
उत्तर:
(१) आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्राला ज्या उपाययोजना
कराव्या लागतात, त्यालाच 'राष्ट्रीय हितसंबंध' असे म्हणतात.
(२) आपल्या राष्ट्राच्या फायदयाचे योग्य काय आहे, हे पाहून शासन निर्णय घेत असते, त्यालाच आपण
'राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करणे' असे म्हणतो.
(३) देशाचा आर्थिक विकास होईल व सामर्थ्यही वाढेल, अशा निर्णयांचा समावेश राष्ट्रीय हितसंबंधात होतो.
(४) देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडत्व यांचे रक्षण करणे ही बाबही राष्ट्रीय हितसंबंधात जोपासली
जाते.
(५) राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते.
(३) जागतिक शांतता.
उत्तर:
(१) राष्ट्राराष्ट्रांमध्ये तणावाचे, हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे, म्हणजेच
'जागतिक शांतता' होय.
(२) केवळ आपल्या देशात शांतता निर्माण होऊन नव्हे; तर शेजारील देशांतही शांतता असेल, तरच
जागतिक शांतता निर्माण होईल.
(३) जागतिक शांतता राष्ट्राराष्ट्रांतील मैत्रीपूर्ण संबंधांवर व सहकार्यावर अवलंबून असते.
(४) अण्वस्त्रे आणि शस्त्रास्त्रवाढ ही जागतिक शांततेला धोका निर्माण करते.
(५) दारिद्र्य, आक्रमकता, धर्मांधता, वाढता वंशवाद आणि अतिरेकी राष्ट्रवाद यांमुळे जागतिक शांततेला तडे
जातात.
(६) आर्थिक विकास, सामंजस्याचे धोरण, सहकार्याची वृत्ती, लोकशाही समाज आणि अन्य राष्ट्रांच्या
सार्वभौमत्वाविषयीचा आदर या गोष्टी जागतिक शांततेला पूरक ठरतात.
४. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय
वाटते?
उत्तर:
(१) अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जगाला अण्वस्त्रांच्या विघातक क्षमतेची कल्पना
आली.
(२) आज जगात रशिया, फ्रान्स, इंग्लंड, जपान, चीन, उत्तर कोरिया, पाकिस्तान आणि भारत ही राष्ट्रे
अण्वस्त्रसज्ज आहेत.
(३) अण्वस्त्रांच्या वाढीमुळे जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत आहेत.
(४) शीतयुद्धाच्या काळातील युद्धसदृश परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे; त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा
धोका संभवतो आहे. म्हणूनच अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, असे मला
वाटते.
५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?
उत्तर:
भारताचे परराष्ट्र धोरण पुढील शाश्वत मूल्यांवर आधारित आहे:
(१) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य.
(२) आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे.
(३) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे.
(४) आंतरराष्ट्रीय कायदयांचा आदर करणे.
(५) मानवी हक्कांबद्दल आदर बाळगून त्यांचे रक्षण करणे.
(२) भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले?
उत्तर: (१) भारत-चीन संबंध निर्माण करून ते वाढवण्याचा पहिला प्रयत्न पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू
यांनी केला.
(२) त्यानंतर प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचे याबाबतीत मोठे योगदान आहे.
(३) नंतरच्या आजपर्यंत झालेल्या प्रधानमंत्र्यांनीही चीनशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले.
(३) भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा.
उत्तर: भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही, याची काळजी
घेणे.
(२) भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे.
(३) भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे.
(४) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य व आंतरराष्ट्रीय कायदयांचा आदर करणे.
६. पुढील संकल्पनाचित्र तयार करा.
उत्तर: