3 . तोडणी


प्र. १. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
 

(अ) मीराने वसंतला ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा सांगितलेला अर्थ.
उत्तर: अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा सांगितला. या वाक्याचा अर्थ नीट समजावा म्हणून ती पुढे म्हणाली तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं न्हाई म्हंजी अंधार, अन पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!.

(आ) वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.
उत्तर: वसंताच्या मनामध्ये शिक्षणाची खूप ओढ होती. पुढे शाळा शिकायची नाही असे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. त्या दिवशी वसंत उपाशीच झोपला. त्याला रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वाचता येत नव्हते ते वाचता यावेत म्हणून त्याने खूप धडपड केली, शेवटी मिराकडून त्याने तो कागद वाचून घेऊन त्यावर लिहिलेल्या ओळीचा अर्थ समजावून घेतला.

(इ) ‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.
उत्तर: दादांना म्हणजेच वसंताच्या वडिलांना उस तोडणीच्या कामात वसंत ची  

मदत हवी होती. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचे शिक्षणा थांबवले. त्यामुळे वसंताला वाचन करता येत नाही, असा या वाक्याचा अर्थ होतो.

प्र. २. वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर:

१. ‘‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?

२. ‘दादा, मले साळांत कवा धाडणार?’

३. ‘‘ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिव्हलंय बग,”

४. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली.

५. वसंतनं लगेच मित्रांना गाठलं. ‘आता म्या साळंला येणार,’ असंवसंत सगळ्यांना सांगत सुटला.

 

 

प्र. ३. खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.
 

(अ) बैलांचे खाद्य.

उत्तर: पाचुंद्यातील सरमड

 

(आ) शंकूच्या आकाराची झोपडी.

उत्तर: साखरशाळा

 

प्र. ४. तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा.
उत्तर:

वसंत हे पात्र मला या कथेतील खूप आवडले कारण,

१)वसंतला शिक्षणाची खूप ओढ होती.

२)त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते.

३)समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो कायम तत्पर असतो.

 
 
प्र. ५. खालील आकृती पूर्ण करा.

मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या

सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले?



 उत्तर: 



 मीरा, वसंत : झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला.

 

इतर बायका : गाडीजवळ चुली पेटवल्या.

 

दामू: आपले बैलांना नदीवरून पाणी पाजून आणले.

 

तारा: भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले.

(अ) गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

(१) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती.

उत्तर: गरीब

 

(२) रात्र, निशा, प्रभात, यामिनी.

उत्तर: प्रभात

 

(३) अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित.

उत्तर: शिक्षित

 

 

(४) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे.

उत्तर: हरवणे

(आ) कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा.
(आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.)

 

(१) वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची .............. .

उत्तर: वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली.

 

 

 (२) गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या............... .

उत्तर: गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

 

 (३) सिमरन आईला घरातल्या कामांसाठी............... .

उत्तर: सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते.

 

 (४) रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा............... .

उत्तर: रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली.

(इ) खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. तेबनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळेशब्द तयार करा.

उत्तर:

परप्रांत

परभाषा

परदेश

परग्रह

परराष्ट्र







(ई) खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.

(१) तांबडं फुटलं.

उत्तर: सकाळ झाली

 

(२) गाडी रुळावर आली.
उत्तर: पुन्हा सारे सुरळीत झाले.

 

(३)   अंधाराकडून उजेडाकडे.

उत्तर: अज्ञानाकडून ज्ञानाकडे

 

(४)   चूल शिलगावली.

उत्तर: चूल पेटवली.

 
(उ) खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.

 (१) ‘ पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय. ’

उत्तर: “पोर, मला तरी कुठं वाचता येतंय.”

 

(२) ‘‘अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं?’’

उत्तर: “अग, सगळी मुले शाळेला गेली आणि तुझ?

 

(३) ‘‘आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू?’’

उत्तर: “आत्ता तुम्ही सगळे म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ?”

 

(४) ‘ आता म्या साळंला येणार. ’

उत्तर: आत्ता मी शाळेत येणार.”

(ऊ) खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा

उत्तर:



शाळेचा पहिला दिवस

उन्हाळी सुट्टी संपत आली होती. आत्ता पुढच्या वर्गात जाणार म्हणून मी नवीन वह्या पुस्तके, दप्तर आणी शाळेचा नवीन गणवेश घेतला. शाळेच्या पहिला दिवस असल्याने मी लकवर उठलो. सर्व तयारी करून शाळेत निघालो. ‘शारदा विद्यामंदिर’ हे माझ्या शाळेच नाव आहे. शाळेची इमारत कौलारू आहे. शाळेच्या आजुबूचा परिसर विविध प्रकारच्या फुलझाडांनी भरलेला आहे. नव्या वर्गात नवीन मित्रांशी ओळख झाली. आमचे वर्गशिक्षक चांगले आहेत ते आम्हांला मराठी हा विषय शिकवतात. पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचा सुगंध काही औरच असतो. आम्ही खेळाच्या तासाला खूप मजा केली. असा हा शाळेचा पहिला दिवस खूप आनंदात गेला.



Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال