(अ) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या’ म्हणत.
उत्तर: घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून, गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असते. त्याच्या किश्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुखः विसरत असते. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यांत उतरवून जात असे म्हणून गावकरी त्याला ‘सपनविक्या’ असे म्हणत.
(आ) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.
उत्तर: आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा. लोकांची सेवा करावी. हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता.
प्र. २. स्वप्नंविकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.
उत्तर:
१) त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल-पंधरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायांत चामडी बूट.
२) त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेळ्या किश्श्यांनी रंगवून फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक होते.
३) त्याचे स्वप्न: आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी.
प्र. ३. खालील आकृत्या पूर्ण करा.
अ)
उत्तर:
१. माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत.
२. स्वप्न आपल्याला समृद्ध करते.
३. ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत, तो माणूसच नाही.
४. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते.
आ)
उत्तर:
१. काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात
२. भलतीसलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात.
३. स्वतः आदर्श बनून वावरावे.
४. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते.
इ)
उत्तर:
१बदाम
२.काजू
३.किसमिस
४.वेलदोडे
५.सुपारी
६.खारीक
७.खोबरे
ई)
उत्तर:
स्वप्न विकणाऱ्याचे किस्से: अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवनारे
ऐकणाऱ्याचे फायदे: १)निरनिरळ्या प्रांतांची, रितीरिवाजांची माहिती मिळायची.
२)स्वप्नात आहोत, असे वाटायचे.