१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था
(अ) राजकीय व्यवस्था
(ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
(क) सामाजिक व्यवस्था
(ड) यांपैकी नाही
(२) राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी..ही होती.
(अ) युद्ध टाळणे
(ब) वसाहतींचे स्वातंत्र्य
(क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे
(ड) निःशस्त्रीकरण करणे
(३) शीतयुद्ध .... या घटनेमुळे संपले.
(अ) संयुक्त राष्ट्रांची स्थापना
(ब) सोव्हिएत युनियनचे विघटन
(क) लष्करी संघटनांची निर्मिती
(ड) क्यूबाचा संघर्ष
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण
(१) पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली.
(२) अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे सर्व राष्ट्रांना वाटू
लागले.
(३) आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे, या
विचारातून पहिल्या महायुद्धानंतर 'राष्ट्रसंघ' या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली.
(२) शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.
उत्तर: हे विधान चूक आहे; कारण
(१) एक ध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे.
(२) शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे दोन महासत्तांच्या गटांत सामील झाली होती.
(३) राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे यालाच 'द्विध्रुवीकरण' असे म्हणतात. म्हणून शीतयुद्धामुळे
जगाचे एक ध्रुवीकरण नव्हे; तर द्विध्रुवीकरण झाले.
(३) मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण
(१) सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी पेरेस्त्रोईका (पुनर्रचना) व ग्लासनोस्त (खुलेपणा)
ही धोरणे अमलात आणली.
(२) या धोरणांमुळे शासनाचे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रांत पुनर्रचना
करण्यात आली.
(३) याचा परिणाम म्हणजे हुकूमशाही नियंत्रणात आली; त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) शीतयुद्ध
उत्तर:
(१) दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत युनियन ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या
प्रयत्नांत एकमेकांची स्पर्धक बनली.
(२) या दोन राष्ट्रांत उघडपणे युद्ध झाले नाही; परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण
झाले.
(३) दोन महासत्तांतील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, शह काटशह यांमुळे जगात युद्धाला पूरक वातावरण
निर्माण झाले. या युद्धसदृश परिस्थितीलाच 'शीतयुद्ध' असे म्हटले जाते.
(२) अलिप्ततावाद.
उत्तर :
(१) दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्तांच्या गटांत
झाली.
(२) जगात असेही काही देश होते, की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते.
(३) या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले; या
धोरणालाच 'अलिप्ततावाद' असे म्हणतात.
(४) परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलग किंवा तटस्थता नव्हे; तर महासत्तांच्या गटांपासून अलिप्त
होय.
(३) परस्परावलंबन.
उत्तर:
(१) जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, यालाच
'परस्परावलंबन' असे म्हणतात.
(२) गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते.
(३) तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या वा गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच
लागते.
(४) कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे
व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेले आहे.
(४) द्विध्रुवीकरण.
उत्तर:
(१) दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन अण्वस्त्रनिर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून
महासत्ता बनले.
(२) अमेरिका आधीच महासत्ता होती.
(३) या दोन महासत्तांच्या गटांत जगातील राष्ट्रांची विभागणी झाली. या विभागणीलाच 'द्विध्रुवीकरण' असे
म्हणतात.
(५) जागतिकीकरण.
उत्तरः
(१) सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर राष्ट्राराष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा
आला.
(२) भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांचे विचार - कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला.
(३) माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या.
(४) देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला
'जागतिकीकरण' असे म्हणतात.
४. पुढील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा.
(१) राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
उत्तर: पहिल्या महायुद्धाचे परिणाम लक्षात घेऊन युद्ध टाळण्यासाठी १९२० साली राष्ट्रसंघ स्थापन करण्यात
आला; परंतु राष्ट्रसंघाला दुसरे महायुद्ध टाळता आले नाही. महायुद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाने पुढील उपाय
करायला हवे होते, असे मला वाटते:
(१) जर्मनी, इटली व स्पेन येथे उदयास येत चाललेल्या हुकूमशाहीस वेळीच अटकाव करायला पाहिजे होता..
(२) जगातील आक्रमक राष्ट्रांवर बहिष्कार घालण्यास अन्य राष्ट्रांना सांगायला पाहिजे होते.
(३) सर्व राष्ट्रांच्या शस्त्रास्त्र निर्मितीवर बंधने आणायला हवी होती.
(४) राष्ट्राराष्ट्रांतील मतभेद, संघर्ष दूर करून त्यांच्यात सहकार्याची व सामंजस्याची भावना निर्माण करायला
हवी होती.
(२) शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावाद आवश्यक होता.
उत्तर: 'अलिप्ततावाद' म्हणजे जगापासून तटस्थता नव्हे; तर महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे
धोरण होय. शीतयुद्धाच्या काळात हे धोरण आवश्यक होते, कारण -
(१) या काळात जगात तणावाचे, अविश्वासाचे वातावरण होते.
(२) दोन्ही महासत्ता छोट्या राष्ट्रांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करीत होत्या.
(३) शस्त्रास्त्रवाढीची स्पर्धा चालू होती.
(४) अशा काळात कोणत्यातरी गटात सामील होऊन आपले स्वातंत्र्य गमावून बसण्यापेक्षा अलिप्ततावादी
धोरण स्वीकारणेच आवश्यक होते.
(३) शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले.
उत्तर:
(१) शीतयुद्धाच्या काळात दोन्ही महासत्तांच्या गटांत शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागून त्यावर प्रचंड पैसा
खर्च होऊ लागला.
(२) त्यामुळे विकास कामे मागे पडली.
(३) शस्त्रास्त्रनिर्मितीकडे अधिक लक्ष दिल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीकडे राष्ट्रांचे दुर्लक्ष झाले.
(४) त्यामुळे वस्तूंची टंचाई निर्माण होऊन लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला.
अशा रितीने शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे सर्वच राष्ट्रांचे दुर्लक्ष झाले.
(४) महासत्ता म्हणून आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून कोणत्या देशांचा उदय होऊ शकतो? का?
उत्तर: माझ्या मते, आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी महासत्ता म्हणून चीनचा उदय होऊ शकतो;
कारण-
(१) चीन अण्वस्त्रधारी देश असून त्याचे लष्करी सामर्थ्य मोठे आहे.
(२) चीनचा भूप्रदेश मोठा असून लोकसंख्याही प्रचंड आहे...
(३) अन्नधान्य, खनिजे, औद्योगिक विकास व तंत्रज्ञान या सर्वच बाबतींत चीन संपन्न आहे.
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
उत्तर:
उत्तर:
शीतयुदधाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या
(१) सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले.
(२) गोर्बाचेव्ह यांनी पेरेस्त्रोईका व ग्लासनोस्त ही धोरणे अमलात आणल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील नियंत्रण
कमी झाले. त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रांत बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
(३) सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार
केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
(४) सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्रे उदयास आली.
(३) शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?
उत्तर:
२०व्या शतकाच्या अखेरीस संपलेल्या शीतयुद्धामुळे जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल
घडून आले :
(१) सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य कमी होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच
एकमेव महासत्ता उरली.
(२) राष्ट्राराष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी
संबंधांना प्राधान्य मिळाले.
(३) युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी
अधिक प्रयत्न करावे लागत आहेत.
(४) पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना
जागतिक महत्त्व प्राप्त झाले.
0 Comments