1. भारतीय उपखंड आणि इतिहास


प्र .१ . खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ .इतिहास म्हणजे काय ?
उत्तर - इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय .

२ .मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो ?
उत्तर - जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती
 करतो .

३ .डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रमुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते ?
उत्तर - डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्‍या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते .

४ .भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?
उत्तर - भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती होय .

प्र .२ . खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .

१ .मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?
उत्तर - मानवी समाज ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असतेमानवाचा आहार वेशभूषा घरबांधणी त्यांचे व्यवसाय ह्या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात .

२ .आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात ?
उत्तर - आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान ,शेतीतून मिळणारे उत्पादन ,वनस्पती, प्राणी, जमिनीतील खनिजे इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात .

३ .भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात ?
उत्तर - अफगाणिस्तान, पाकिस्तान ,श्रीलंका,नेपाळ ,भूतान, बांगलादेश व भारत हे सारे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात .

प्र ३रा . कारणे लिहा .

१ ) इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते .
उत्तर - मानवी समाज या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या भौगोलिक प्रदेशाच्या वैशिष्ट्यांवर त्याची जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असतेजर पर्यावरणाचा रास झाल्यास गावे उजाड होतातअशाप्रकारे भौगोलिक परिस्थिती आणि मानव याचा संबंध आहे आणि म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते .

२ ) लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते .
उत्तर - अनेकदा पर्यावरणाचा र्‍हास दुष्काळ आक्रमण किंवा काही भौगोलिक संकटे येतात अशावेळी त्या भागातील लोकांना अन्नधान्याची ची आणि इतर साधनांची कमतरता भासते आणि म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव सोडून जाणे भाग पडते .

प्र .४ ) डोंगराळ व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा .
उत्तर -
* डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन -

१ . या प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण कमी असते
२ .या प्रदेशातील लोकांना अन्नासाठी शिकारीवर किंवा जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते .
३ .सुपीक जमीन नसल्यामुळे येथील लोकांना तृणधान्य व भाज्या कमी उपलब्ध होतात .
४ .या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन कष्टाचे असते .

*मैदानी प्रदेशातील लोकजीवन-

१ .या प्रदेशात सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते .
२ येथे सुपीक जमीन असल्यामुळे येथील लोकांना तृण धान्य व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात
३ .या प्रदेशातील लोकांना अन्नासाठी शिकारीवर किंवा जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहावे लागत नाही .
४ .या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन कमी कष्टाची असते .

प्र ५ ) पाठ्यपुस्तकातील वर दिलेल्या भारत-प्राकृतिक या नकाशा चे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा .

१ )भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?
उत्तर - भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालया पर्वतांच्या रांगा आहेत .

२ ) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?
उत्तर भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत .

३ )गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो ?
उत्तर - गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांग्लादेशात होतो .

४ )भारताच्या पुर्वेस कोणती बेटे आहेत ?
उत्तर -भारताच्या पुर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत .

५ )थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर - थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال