१) विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे.............
अनुभवणे होय.
२) भारत हे जगातील एक महत्त्वाचे................
राष्ट्र आहे.
३) सहकार्यामुळे समाजातील............. अधिक निकोप होते .
उत्तर : १) सहअस्तित्व, २) धर्मनिरपेक्ष, ३) परस्परावलंबन.
प्र २ . एका वाक्यात उत्तरे लिहा
१) सहकार्य म्हणजे काय?
उत्तर : परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत
करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय.
२) धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे?
उत्तर : भाषिक व धार्मिक विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण
धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे.
प्रश्न ३. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
१) भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते?
उत्तर : भारतीय समाजात विविध भाषा, धर्म, परंपरा, चालीरीती असणारे लोक राहतात प्रत्येक समाज आपल्या पद्धतीने आपले उत्सव व सणवार साजरे करतात त्यांच्या पूजा उपासनेच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत .
लोक राहतात. प्रत्येक समाज आपल्या पद्धतीने आपले उत्सव व सणवार
साजरे करतात. त्यांच्या पूजा-उपासनेच्या पद्धतीदेखील वेगवेगळ्या आहेत.
विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. यातूनच भारतीय समाजातील एकता दिसून येते.
२) समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात ?
उत्तर : दोन व्यक्तींमधील मते, विचार, दृष्टिकोन जुळले नाहीत.
एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह, गैरसमज यामुळे समाजात संघर्ष
निर्माण होऊ शकतात.
३) सहकार्यामुळे कोणते फायदे होतात?
उत्तर : सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते.
समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सहकार्यामुळे हे फायदे होतात.
४) तुमच्यासमोर दोन मुले भांडत आहेत, तर तुम्ही काय कराल?
उत्तर : त्या मुलांच्या भांडण्याचे कारण समजावून घेईन. चूक कोणाची
आणि बरोबर कोण, हे त्या दोघांनाही पटवून देईन. त्यामुळे संघर्षाचा प्रसंग टाळला जाईल.
५) तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात. तुम्ही कोणकोणती
कार्ये कराल?
उत्तर : १) वर्ग शांत ठेवण्याचा प्रयत्न करीन.
२) वर्गावर शिक्षक यायला जास्त वेळ लागला, तर मुख्याध्यापकांना तशी सूचना सांगून येईन.
३) वर्गातील मुलांना वर्गाबाहेर येऊ देणार नाही.
४) दंगा करणाऱ्या मुलांची नावे टिपून ती वर्गशिक्षकांना दाखवीन.
५ ) शिक्षकांनी सांगितलेली कामे करील .
६ ) अभ्यास करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देईन.