(१) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला......... गरज वाटली .
(२) माणसातील कलागुणांचा विकास............होतो.
(३) आपल्या काही भावनिक आणि.........गरजाही असतात.
उत्तरे : (१) नियमांची
(२) समाजामुळे
(३) मानसिक
प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
(१) आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत ?
उत्तर : अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत .
(२) आपल्याला कोणाचा सहवास आवडतो?
उत्तर : आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्र-मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला
आवडतो.
(३) समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते ?
उत्तर : समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची, आपल्या कलागुणांचा विकास करण्याची व आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.
प्रश्न ३. तुम्हाला काय वाटते ? दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
१) समाज कसा तयार होतो?
उत्तर : समाजात सर्व स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले-मुली या
सर्वांचा समावेश होतो. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात.त्यांच्यात परस्पर देवाणघेवाण, परस्परसंबंध निर्माण होतो. काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांचा समाज बनतो.
२) समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते?
उत्तर : समाजामुळेच आपले दैनंदिन जीवन सुखरूप होते. अन्न, वस्त्र,
निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपीव्यवस्था निर्माण करावी लागते.
३) माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते?
उत्तर : समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटू लागली. त्यातूनच रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळेच माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले.
४) समाजव्यवस्था अस्तित्वात नसती, तर कोणत्या अडचणी आल्या
असत्या?
उत्तर : समाजव्यवस्था अस्तित्वात नसती, तर समाजामध्ये गोंधळ माजला असता .प्रत्येकजण मन मानेल तसा वागला असता. विविध संस्था, संघटना तयार झाल्या नसत्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठा उपलब्ध झाल्या नसत्या. बँका, कारखाने तयार झाले नसते .
प्रश्न ४. पुढील प्रसंगी काय कराल ?
१) तुमच्या मित्राची/ मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे?
उत्तर : त्याला ज्या वस्तूची गरज आहे, ती मी त्याला देईन. त्याचे काम झाले, की परत घेईन.
२) रस्त्यात एखादी अंध/अपंग व्यक्ती भेटली.
उत्तर : रस्त्यात एखादी अंध व्यक्ती भेटली, तर तिचा हात धरून तिला पलीकडे सोडण्यास मदत करीन.