प्र. ५ वा
सरपंच : ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच
वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी
एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात.
ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या
अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना
प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. योग्य
पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता
येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे
कामकाज उपसरपंच पाहतो.
मुख्य कार्यकारी अधिकारी : जिल्हा परिषदेने
घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा
परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची
नेमणूक राज्यशासन करते.