अ) अचूक पर्यायासामोरील चौकटीत अशी खुण करा.
१)पृथ्वीवर पूर्व- पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?
रेखावृत्त
आंतरराष्ट्रीय वाररेषा
अक्षवृत्ते
उत्तर: अक्षवृत्ते
२) रेखावृत्ते कशी असतात?
वर्तुळाकार
बिंदूस्वरूप
अर्धवर्तुळाकार
उत्तर: अर्धवर्तुळाकार
३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते?
कोनीय अंतर
गोलार्ध
वृत्तजाळी
उत्तर: वृत्तजाळी
४) उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत?
९०
८१
९१
उत्तर: ९०
५) पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोत्या वृत्तांमुळे तयार होतात?
०० मूळ अक्षवृत्त व १८० ० रेखावृत्त
०० मूळ रेखावृत्त व १८० ० रेखावृत्त
उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ते
उत्तर: ०० मूळ रेखावृत्त व १८० ० रेखावृत्त
६) खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदूस्वरूपातील वृत्त कोणते?
विषुववृत्त
उत्तर ध्रुव
मूळ रेखावृत्त
उत्तर: उत्तर ध्रुव
७) पृथ्वीगोलावर ४५० उ. अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते.
एक
अनेक
दोन
उत्तर: अनेक
ब) पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.
१) मुळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.
उत्तर: अयोग्य . मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.
२) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.
उत्तर: अयोग्य. सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत.
३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत.
उत्तर: योग्य.
४) ८० ४| ६५|| उत्तर रेखावृत्त आहे
उत्तर: अयोग्य . ८० ४| ६५|| उत्तर अक्षवृत्त आहे.
५) रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात.
उत्तर: अयोग्य. रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात.
क) उत्तरे लिहा.
१) उत्तर धृवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल?
उत्तर: उत्तर ध्रुवाचे अक्षांश ९० ० उ. अक्षवृत्त रेखांश अल्फा रेखावृत्त याप्रमाणे सांगता येतील.
२) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते?
उत्तर: कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर ४७० असते.
३) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नवे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.
उत्तर: ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया इत्यादी.
४) वृत्तजाळीचे उपयोग लिहा.
उत्तर:
१)पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते.२) पृथ्वीवरील स्थान निश्चिती साठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरत आहे. ३) भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मप , विकीम्यापिया व इस्त्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमधे अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. ४) आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशा दर्शकामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
ड) पुढील तक्ता पूर्ण करा.
वैशिष्ट्ये
अक्षवृत्ते
रेखावृत्ते
आकार
वर्तुळाकार
अर्धवर्तुळाकार
माप/ अंतर
प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते.
प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते.
दिशा/ संबंध
दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते. म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.
दोन रेखावृत्तां,मध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर धोनही धृवांकडे हे अंतर कमी होत जाते.
0 Comments