प्रश्न १ ला : दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) भारताने. …. च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
(अ) सुनिल गावसकर
(ब) कपिल देव
(क) सय्यद किरमाणी
(ड) संदीप पाटील
उत्तर : – (ब) कपिल देव
(२) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात. इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
(अ) पंजाबी
(ब) फ्रेंच
(क) इंग्रजी
(ड) हिंदी
उत्तर :- (क) इंग्रजी
प्रश्न २ रा : खालील तक्तातील माहिती पूर्ण करा.
( उत्तर तक्ता न देता दिले आहे नोटबुक मध्ये लिहताना विद्यार्थ्यांनी तक्ता काढावा )
भारतातील महत्त्वाच्या भाषा :: मराठी व हिंदी
ऑलिंपिक स्पर्धांमध्ये आणि पदकप्राप्त खेळाडू :: सुनील गावसकर कपिल देव
तुम्ही पाहिलेले बालचित्रपट :: बाळ शिवाजी व श्यामची आई
विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे :: Z २४ तास, ABP माझा
प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.
उत्तर :- भारताने १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला त्यामुळे या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाली. सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचा विक्रम केल्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेत भर पडली. १९८५ मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले ; त्यामुळे क्रिकेटचा खेळ अधिकच लोकप्रिय झाला. त्यामुळे भारतात अनेक खेळ मागे पडूनसर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.
(२) चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.
उत्तर :- कृष्णधवल चित्रपटांचे युग संपून ते रंगीत बनू लागले. चित्रीकरण परदेशातही होऊ लागले. ३-४ तास चालणारा चित्रपट दीड-दोन तासांवर आला. एकाच चित्रपटगृहात एकच चित्रपट १०० आठवडे चालण्याचे प्रमाण संपले. आता एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांत दिसू लागला. या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.
प्रश्न ४ था : पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे ?
उत्तर :- बोलीभाषा मुख्य भाषेला म्हणजेच प्रमाण भाषेला शब्दांचा पुरवठा करआहे. समृद्ध बनवतात. बोलीभाषेतूनच त्या समूहाची परंपरा, पद्धती, चालीरिती आणि संस्कृतीची ओळख होते. बोलीभाषा हा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा आहे. तो कमी होता कामा नये. म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.
(२) वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर :- स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांच्या स्वरूपात आणि उद्दिष्टांत आता बदल झाले आहेत. कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत. जिल्ह्याचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे. दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रेही आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागली आहेत. आजची वृत्तपत्रे विविध मार्गांनी समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत.
(३) दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत ?
उत्तर :- सुरूवातीस कृष्णधवल असणारे दूरदर्शन कालांतराने रंगीत झाले. मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळांत मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम व वेळ वाढली. विविध प्रकारचे कार्यक्रम व मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली. अनेक खाजगी वृत्तवाहिन्या असल्यामुळे सुरुवातीचे निरस, एकसुरी असे बातम्यांचे स्वरुप बदलले गेले. दरदर्शनची भाषा, सादरीकरणाचे तंत्र व तंत्रसज्ज स्टुडिओ यात सुधारणा झाली. बाह्यचित्रीकरण व्हॅन्सचा वापर होऊ लागल्यामुळे वार्तांकनात बहुविधता, जिवंतपणा आणि खुलेपणा आला.
उपक्रम :-
दादासाहेब फाळके यांच्या विषयी माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा.
उत्तर :- धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके. जन्म त्र्यंबकेश्वर, मृत्यू नाशिक. फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले व्यक्ती होते. यामुळेच त्यांना भारतीय चित्रपटाचा जनक म्हणले जाते. १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिशंद्र हा पहिला मुक चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची नावे यादी :
अमिताभ बच्चन, अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, देविकाराणी, पृथ्वीराज कपूर,प्राण, मनोज कुमार, विनोद खन्ना, शशी कपूर, सुलोचना